ETV Bharat / bharat

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक; असदुद्दीन ओवैसी करत होते प्रवास - वारिस पठाण यांनी केले ट्विट

खिडकीच्या तुटलेल्या काचांची छायाचित्रे शेअर करत AIMIM नेते वारिस पठाण यांनी ट्विट केले की, गेल्या दिवशी असदुद्दीन ओवेसी, साबीर काबलीवाला आणि आमची टीम अहमदाबादहून सुरतला वंदे भारत एक्स्प्रेस ( Vande Bharat Express ) ट्रेनमधून प्रवास करत असताना काही अज्ञात लोकांनी दगडफेक केली.

Vande Bharat Express
वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक
author img

By

Published : Nov 8, 2022, 7:58 AM IST

Updated : Nov 8, 2022, 5:40 PM IST

गुजरात : गुजरातमध्ये वंदे भारत एक्सप्रेसवर ( Vande Bharat Express ) दगडफेक झाली. काही अज्ञात व्यक्तींनी रेल्वेच्या खिडकीच्या काचावर दगडफेक केली. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी ट्रेनमध्ये होते. एआयएमआयएमचे नेता वारिस पठाण यांनी दावा केला की पक्षाचे प्रमुख, पक्षाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष साबीर काबलीवाला आणि पक्षाचे इतर नेते ही घटना घडली तेव्हा अहमदाबाद ते सुरत या 'वंदे भारत एक्स्प्रेस'मधून प्रवास करत होते.

वारिस पठाण यांनी केले ट्विट : खिडकीच्या तुटलेल्या काचांची छायाचित्रे शेअर करत एआयएमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी ट्विट केले की, गेल्या दिवशी असदुद्दीन ओवेसी, साबीर काबलीवाला आणि आमची टीम अहमदाबादहून सुरतला 'वंदे भारत एक्स्प्रेस' ट्रेनमधून प्रवास करत असताना काही अज्ञात लोकांनी दगडफेक केली. ओवेसी यांच्यावर हे दगडफेक मुद्दाम केल्याचा दावा त्यांनी केला. या घटनेनंतर गुजरातमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना पठाण यांनी असा दावा केला की, असदुद्दीन ओवेसी ज्या कोचमध्ये बसले होते, त्यावर दोनदा दगडफेक करण्यात आली होती.

  • आज शाम जब हम @asadowaisi साहब,SabirKabliwala साहब और @aimim_national की टीम अहमदाबाद से सूरत के लिए 'Vande Bharat Express' train में सफर कर रहे थे तब कुछ अज्ञात लोगों ने ट्रेन पर ज़ोर से पत्थर मारकर शीशा तोड़ दिया!#GujaratElections2022 pic.twitter.com/ZwNO2CYrUi

    — Waris Pathan (@warispathan) November 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ओवेसी गुजरातच्या दौऱ्यावर : ते म्हणाले की, आम्ही अहमदाबाद ते सुरत असा वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास केला. आम्ही गंतव्यस्थानापासून 20 ते 25 किमी अंतरावर असताना दगडफेक झाली. ज्यामुळे खिडकीच्या काचा फुटल्या. ओवेसी डब्यात बसले होते. पठाण म्हणाले की, दगडफेकीने तुम्ही कधीही आमच्या हक्कासाठी आमचा आवाज दाबू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी 30 सप्टेंबर रोजी गांधीनगर-मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. आगामी निवडणुका लक्षात घेऊन ओवेसी गुजरातच्या दौऱ्यावर येत आहेत, हे विशेष. राज्यात 1 आणि 5 डिसेंबरला विधानसभा निवडणुका होणार असून, 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

Last Updated : Nov 8, 2022, 5:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.