ETV Bharat / bharat

Jharkhand Crime News : नवरा म्हणाला बाजारात नको जाऊ..रागाच्या भरात बायकोने केले असे काही.. - विटेने ठेचून खून

झारखंडच्या खुंटी येथे पत्नीनेच पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे. (wife murdered her husband). पत्नीने पतीच्या डोक्यात विटेने वार करून त्याची हत्या केली. (wife murdered her husband in khunti Jharkhand). पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक करून तिची कारागृहात रवानगी केली आहे. वाचा काय आहे संपूर्ण मामला..

Jharkhand Crime News
Jharkhand Crime News
author img

By

Published : Dec 19, 2022, 9:10 PM IST

खुंटी (झारखंड) : तोरपा पोलीस स्टेशन हद्दीतील सोनापूरगढ येथील अर्जुन सिंग याने पत्नीला बाजारात जाण्यास मनाई केली. यामुळे संतापलेल्या पत्नीने अर्जुनचा विटेने ठेचून खून केला. (wife murdered her husband). घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून हत्येची आरोप पत्नी कलावती देवी हिला अटक केली आहे. चौकशीत कलावती हिने आपला गुन्हा कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले. (wife murdered her husband in khunti Jharkhand).

विटेने पतीच्या डोक्यात वार : मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन सिंहची पत्नी कलावती देवी हिने आपल्या पतीला बाजारात जाण्याबद्दल विचारले. मात्र अर्जुनने तिला बाजारात जाण्यास नकार दिला. यानंतर पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला. या वादात कलावती यांनी वीट उचलून पतीच्या डोक्यात वार केले. त्यामुळे अर्जुन जखमी होऊन जमिनीवर पडला. एवढे होऊनही कलावतीने अर्जुनच्या डोक्यात घाव घालने थांबवले नाही.

गुन्हा केला कबुल : गावकऱ्यांनी सांगितले की, ते वाद मिटवण्यासाठी पोहोचले असता कलावती यांनी त्यांना शिवीगाळ करून पळवून लावले. त्यानंतर कलावती यांनी जखमी पतीला खांद्यावर उचलून घरी आणले आणि खोलीत बंद केले. त्यानंतर अर्जुनचा मृत्यू झाला. गावकऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. अर्जुनचे काका कलेश्वर सिंह यांच्या वक्तव्यावरून कलावती देवी हिच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तोरपा पोलीस ठाण्याचे प्रभारी मनीष कुमार यांनी सांगितले की, हत्येनंतर आरोपी कलावती घरात बसली होती. पोलिसांनी कलावतीची चौकशी केली असता तिने बाजारात जाण्यास नकार दिल्याने तिने हा खून केल्याचे सांगितले. आरोपी कलावती हिला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.