नवी दिल्ली - डगमगलेली अर्थव्यवस्था, जीडीपी, चीन भारत वाद, शेतकरी आंदोलन अशा विविध मुद्द्यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत आहे. यातच त्यांनी एक टि्वट करून मोदींवर अप्रत्यक्षपणे टिका केली आहे. इतक्या सगळ्या हुकूमशहाची नावे 'एम' ने का सुरू होतात? असा सवाल त्यांनी केला आहे. नाव घेता त्यांनी मोदींचा हुकूमशाह असा उल्लेख केला आहे.
सगळ्या हुकूमशहाची नावे 'एम' ने का सुरू होतात?, असा सवाल त्यांनी टि्वटमधून केला. तसेच त्यांनी काही हुकूमशहांची नावे जाहीर केली. यात एफ. मार्कोस (फिलीपाईन्स), बी. मुसोलिनी (इटली), एस. मिलोसेविक (सर्बिया), हुस्नी मुबारक (मिस्र), मोबुतू (कांगो), मिशेल मिकोमबेरो (बुरुंडी), परवेज मुशर्रफ (पाकिस्तान) हुकूमशहाची नावे आहेत.
यापूर्वी राहुल गांधींनी मोदींवर चीन-भारत वादावरून टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनविरोधात एक शब्दही उच्चारत नसून दुर्दैवाने त्यांच्यामध्ये हिंमतच नाही, असे राहुल गांधी म्हणाले होते. तसेच आंदोलक शेतकऱ्यांनी दिल्लीत प्रवेश करू नये म्हणून मार्गावर मोठे खिळे ठोकून मार्ग बंद करण्यात आलं आहेत. तर काही मार्गांवर भिंती उभारण्यात आल्या आहेत. यावरून राहुल गांधींनी केंद्रावर टीका केली. पुल बांधा- भिंती उभा करु नका, असे टि्वट त्यांनी केले होते.