ETV Bharat / bharat

पडद्यामागं राहून काम करणारा नेता ते छत्तीसगडचे मुख्यमंत्री, कोण आहेत विष्णुदेव साय?

Chhattisgarh CM Vishnu Deo Sai : छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी विष्णुदेव साय यांची निवड अनेकांना अनपेक्षित होती. पडद्यामागं राहून काम करणारे साय राज्याच्या बाहेर फारसे कुणाला माहीत नाहीत. मात्र केंद्रीय नेतृत्वाची त्यांच्यावर नजर होती. या विधानसभा निवडणुकीत त्यांनी ज्या प्रकारे काम केलं, ते पाहून कार्यकर्त्यांपासून हायकमांडपर्यंत सर्वजण प्रभावित झाले होते. आता याचं फळ त्यांना मिळालं आहे.

Vishnu Deo Sai
Vishnu Deo Sai
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2023, 6:24 PM IST

विष्णुदेव साय

रायपूर Chhattisgarh CM Vishnu Deo Sai : छत्तीसगडमध्ये ३ डिसेंबरपासून सुरू असलेला मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबतचा सस्पेन्स अखेर रविवारी संपला. आदिवासी समाजातून येणारे विष्णुदेव साय राज्याचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्या नावाची घोषणा होताच कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला.

विष्णुदेव साय यांच्या कामाची पद्धत : विष्णुदेव साय हे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची पहिली पसंती म्हणून समोर आले आहेत. हे त्यांच्या कार्यक्षमतेमुळं शक्य झालं. विष्णुदेव साय जेव्हा केंद्रात मंत्री होते तेव्हा त्यांनी असे अनेक निर्णय घेतले जे मैलाचे दगड ठरलेत. केंद्रीय नेतृत्वाला त्यांची काम करण्याची पद्धत आवडली. विष्णुदेव साय यांना जवळून ओळखणारे लोक सांगतात की, ते कुठेही गेले, मग ते मंत्रालय असो किंवा राज्य, ते त्या कामात स्वत:ला झोकून देतात. पक्षाचा विजय सुनिश्चित करण्यासाठी पडद्याआड काम करणं असो किंवा सार्वजनिक हिताचे मोठे निर्णय घेणं असो, विष्णुदेव हे नेहमीच केंद्रीय नेतृत्वाची पसंती राहिले आहेत.

साधं राहणीमान : या विधानसभा निवडणुकीत साय यांनी ज्या पद्धतीनं काम केलं, ते पाहून कार्यकर्त्यांपासून ते हायकमांडपर्यंत सर्वजण प्रभावित झाले आहेत. साय यांच्यासोबत काम करणारे कार्यकर्ते आणि त्यांचे सहकारीही त्यांच्या साधेपणाचं कौतुक करतात. खासदार आणि केंद्रीय मंत्री असतानाही ते सर्वसामान्यांसारखे राहिले. त्यांनी अनेकवेळा आपल्या सुरक्षा रक्षकांना खडसावलं की, कोणालाही माझ्या भेटीपासून अडवू नका. कदाचित भेटायला येणारी व्यक्ती अडचणीत असू शकते.

विष्णुदेव साय यांचा राजकीय प्रवास : जशपूरच्या आदिवासी पट्ट्यातील कुनकुरीमधून विजयी झालेल्या विष्णुदेव साय यांचा छत्तीसगडच्या राजकारणात मोठा प्रभाव आहे. सरगुजामधील लोक त्यांना मोठ्या भावाचा दर्जा देऊन त्यांचा आदर करतात. प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना नावानं ओळखणारा नेता म्हणजे विष्णुदेव साय. या देशात कार्यकर्त्यांना नावानं ओळखणारे राजकारणी फार कमी आहेत. महाराष्ट्रातील नेता शरद पवार हे त्यापैकी एक.

संघ आणि केंद्रीय नेतृत्वाशी जवळीक : विष्णुदेव साय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे मानले जातात. निवडणूक आली की, पक्ष त्यांच्यावर नेहमीच मोठी जबाबदारी सोपवतो. विशेष म्हणजे, प्रत्येकवेळा त्यांनी ती जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे. २०२३ च्या विधानसभा निवडणुका हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण. विष्णुदेव साय माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याही जवळचे मानले जातात. रमण सिंह यांनीच त्यांना राजकारणात आणलं. पुढे त्यांची प्रतिभा पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना केंद्रीय मंत्री बनवलं. विष्णुदेव साय यांना छत्तीसगडची कमांड देण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव. त्यांना केंद्रात आणि राज्यातही काम करण्याचा अनुभव आहे.

प्रदीर्घ राजकीय अनुभव : विष्णुदेव साय १९९९ साली पहिल्यांदा लोकसभेचे सदस्य बनले. त्यानंतर ते २००४ आणि २००९ मध्ये सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले. साय यांचा विजयी प्रवास २०१६ पर्यंत कायम होता. त्यानंतर पक्षानं त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी दिली आणि कॅबिनेट राज्यमंत्री केलं. त्यांनी दोन वर्षांसाठी छत्तीसगड भाजपाचं प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे. आता पक्षानं त्यांची कार्यक्षमता लक्षात घेऊन मुख्यमंत्रीपदाची मोठी जबाबदारी दिली आहे.

हे वाचलंत का :

  1. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्र्यांची घोषणा, आदिवासी नेते विष्णुदेव साय यांच्या नावावर शिक्कामोर्तब
  2. मायावती राजकारणातून निवृत्तीच्या मार्गावर? २८ वर्षीय पुतण्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.