ETV Bharat / bharat

SHANKAR MISHRA : एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये महिला प्रवाशावर लघवी करणारा शंकर मिश्रा कोण आहे, ते जाणून घ्या - एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये महिलेशी गैरवर्तणुक

न्यूयॉर्क-दिल्ली एअर इंडियाच्या विमानात (AIR INDIA FLIGHT) एका सहप्रवाशी महिलेवर लघवी केल्याचा आरोप (URINATED ON A WOMAN) असलेल्या व्यक्तीचे नाव शंकर मिश्रा (DRUNKEN MAN SHANKAR MISHRA) असे आहे. तो मुंबईचा रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. एअरलाइन्सने तक्रार केल्यानंतर बुधवारी मिश्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 26 नोव्हेंबर रोजी घडली होती.

SHANKAR MISHRA
शंकर मिश्रा
author img

By

Published : Jan 6, 2023, 3:23 PM IST

मुंबई : न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात (AIR INDIA FLIGHT) एका व्यक्तीने वृद्ध महिलेवर लघवी (URINATED ON A WOMAN) केली. घटनेला महिनाभर उलटल्यानंतर आरोपीची ओळख उघड झाली आहे. फ्लाइटमध्ये महिलेवर लघवी करणारा एक व्यावसायिक असून; त्याचे नाव शंकर मिश्रा (DRUNKEN MAN SHANKAR MISHRA) आहे. तो मुंबईतील मीरा रोड येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. शंकर हा भारतातील वेल्स फार्गोचा उपाध्यक्ष आहे. ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी असून तिचे मुख्यालय कॅलिफोर्निया येथे आहे.

आरोपी फरार : दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुंबईतील मीरा रोडवर राहतो. तो आता मुंबईत नाही. घटनेच्या वेळी फ्लाइटमध्ये उपस्थित असलेल्या सर्व क्रू मेंबर्सना नोटीस पाठविली जाऊ शकते आणि त्यांचे बयान नोंदवले जाऊ शकते. आरोपींविरुद्ध लुक आऊट सर्कुलर (LOC) जारी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत केवळ 4 क्रू मेंबर्स तपासात सामील झाले आहेत. इतर आज तपासात सहभागी होणार आहेत. अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले की, दिल्ली पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी अनेक पथके पाठवली आहेत, मात्र तो फरार आहे.

आजीवन बंदी घालण्याचा अधिकार : एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मिश्रा हा मुंबईचा रहिवासी आहे. आम्ही आमची टीम मुंबईतील त्यांच्या ओळखीच्या ठिकाणी पाठवली होती, पण तो फरार आहेत. आमची टीम त्याला शोधत आहे. DGCA ने 2017 मध्ये जारी केलेल्या नागरी विमान वाहतूक आवश्यकता (CAR) अंतर्गत, अनियंत्रित प्रवाशांना हाताळण्यासंदर्भात, विमान कंपन्यांना एखाद्या व्यक्तीला विमानात बसण्यास आजीवन बंदी घालण्याचा अधिकार आहे.

एअरलाइनचे वर्तन 'अव्यावसायिक': नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) गुरुवारी सांगितले की, 26 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये एका प्रवाशाने सहप्रवाशावर 'लघवी' केल्याच्या प्रकरणी एअरलाइनचे वर्तन 'अव्यवसायिक' होते. न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटमधील अधिकारी आणि क्रू मेंबर्सना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल कारवाई का करू नये, अशी विचारणा नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने केली आहे. गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर रोजी एका मद्यधुंद व्यक्तीने (DRUNKEN MAN SHANKAR MISHR) न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटच्या 'बिझनेस क्लास'मध्ये आपल्या सहप्रवाशावर लघवी केल्याचा आरोप आहे. ही महिला ज्येष्ठ नागरिक असून तिचे वय ७० वर्षांपेक्षा जास्त आहे.

प्रवाश्यावर ३० दिवसांची प्रवास बंदी : प्रथमदर्शनी असे दिसते की, विमानातील अनियंत्रित प्रवाशांना हाताळण्यासंबंधीच्या तरतुदींचे पालन केले गेले नाही, असे DGCA ने एका निवेदनात म्हटले आहे. टाटा समूहाच्या मालकीच्या एअरलाइनने बुधवारी सांगितले की, त्यांनी प्रवाश्यावर 30 दिवसांची प्रवास बंदी लादली आहे आणि क्रू मेंबर्सनी परिस्थिती हाताळण्यात काही चूक झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. आरोपी शंकर मिश्रा हा अमेरिकन बहुराष्ट्रीय वित्तीय सेवा कंपनीच्या भारतीय युनिटचा उपाध्यक्ष आहे. या कंपनीचे मुख्यालय कॅलिफोर्निया येथे आहे.

एअर इंडियाच्या अधिकार्‍यांना नोटीस बजावली : डीजीसीएने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी एअर इंडियाचे उत्तरदायी व्यवस्थापक, फ्लाइट सर्व्हिसेसचे संचालक, त्या फ्लाइटचे सर्व पायलट आणि क्रू मेंबर्स यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे आणि त्यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल तक्रार करण्यास सांगितले आहे. याबाबत त्यांच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये? असा प्रश्न देखील डीजीसीएने केला आहे. निवेदनानुसार, न्यायाच्या अत्यावश्यकतेमुळे, त्यांना डीजीसीएला उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे आणि त्या आधारावर पुढील कारवाई केली जाईल.

आणखी एक घटना : दरम्यान, एअरलाइनच्या पॅरिस-दिल्ली फ्लाइटमध्ये एका प्रवाशाने सहप्रवाशाच्या ब्लँकेटवर कथितपणे लघवी केल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती फ्लाइटच्या वैमानिकाने IGI विमानतळावर दिली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, 6 डिसेंबर रोजी एअर इंडियाच्या फ्लाईट क्र. 142 घडली आणि विमानाच्या पायलटने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ला या प्रकरणाची माहिती दिली, त्यानंतर प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले. हे प्रवासी कोणत्या वर्गात प्रवास करत होते हे कळू शकले नाही. न्यूयॉर्क-नवी दिल्ली फ्लाइटवर आपल्या निवेदनात, DGCA ने म्हटले आहे की, 26 नोव्हेंबर 2022 रोजी प्रवाशाने केलेल्या गैरवर्तनाची घटना 4 जानेवारी 2023 रोजी त्यांच्या निदर्शनास आली.

प्रथमदर्शनी नियम पाळले नाहीत, डीजीसीए : डीजीसीएच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, विमान वाहतूक नियामकाला ताबडतोब कोणत्याही घटनेचा अहवाल देण्यास एअरलाइन बांधील आहे. परंतु 26 नोव्हेंबरच्या घटनेच्या संदर्भात स्पष्टपणे पालन केले नाही. डीजीसीएने सांगितले की, त्यांनी एअर इंडियाकडून घटनेचा तपशील मागवला आहे. त्यानंतर निवेदनात म्हटले आहे की, एअरलाइनच्या उत्तराच्या आधारे, प्रथमदर्शनी असे दिसते की विमानातील अनियंत्रित प्रवाशांच्या हाताळणीशी संबंधित तरतुदींचे पालन केले गेले नाही. त्यात म्हटले आहे की, संबंधित एअरलाइनचे वर्तन अव्यावसायिक असल्याचे दिसून येते आणि यामुळे सिस्टमिक बिघाड झाला आहे. डीजीसीएने सांगितले की, प्रथमदर्शनी असे दिसते की नियमांचे पालन केले गेले नाही. चिडून आपले अवयव दाखवले. दरम्यान, सूत्रांनी गुरुवारी सांगितले की, एअर इंडियाने नोटीसला उत्तर देताना 4 जानेवारी रोजी डीजीसीएला सांगितले की त्यांच्या कर्मचार्‍यांनी संबंधित कायदा अंमलबजावणी करणार्‍यांकडे तक्रार केली नाही. कारण असे दिसते की दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाला आहे आणि त्या महिलेने कारवाईसाठी केलेली तिची प्रारंभिक विनंती मागे घेतली आहे.

या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले की, एअर इंडियाने 4 जानेवारीच्या नोटीसला गुरुवारी डीजीसीएला उत्तर पाठवले. यामध्ये 26 नोव्हेंबर 2022 रोजी एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक 102 मध्ये घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतर्गत समितीचा अहवाल येईपर्यंत आरोपी व्यक्तीला एअर इंडियाच्या विमानात बसण्यास ३० दिवसांची बंदी घालण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.