ETV Bharat / bharat

Cyclone Mocha : मोचा चक्रीवादळ होणार तीव्र, बंगालमध्ये 8 एनडीआरएफ पथके तैनात - एनडीआरएफची पथके तैनात

मोचा चक्रीवादळ 12 मे रोजी अती तीव्र चक्रीवादळात रुपांतरीत होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे बंगालच्या दिघामध्ये 8 एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत.

Cyclone Mocha
मोचा चक्रीवादळाचा धोका असलेला प्रदेश
author img

By

Published : May 12, 2023, 12:29 PM IST

Updated : May 12, 2023, 2:34 PM IST

नवी दिल्ली : मोचा चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता असल्याने पश्चिम बंगालच्या दिघामध्ये 8 एनडीआरएफ पथके तैनात करण्यात आली आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या इशाऱ्यानंतर या पथकांना तैनात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मोचा चक्रीवादळ 14 मे पर्यंत तीव्र होणार असल्याने 8 पथकांसह 200 बचावकर्ते तैनात करण्यात आले आहेत.

मोचा चक्रीवादळ 12 मे रोजी होणार तीव्र : सध्या मोचा चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरात असून 12 मे रोजी त्याची तीव्र चक्रीवादळात रुपांतर होणार असल्याची माहिती एनडीआरएफचे कमांडंट गुरमिंदर सिंग यांनी दिली. मोचा चक्रीवादळ 12 मे रोजी तीव्र चक्रीवादळात रुपांतरीत होऊन त्याचे 14 मे रोजी अत्यंत तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आम्ही 8 पथके तैनात केले असून त्यासह एनडीआरएफचे 200 बचावकर्ते जमिनीवर तैनात आहेत. 100 बचावकर्ते स्टँडबायवर असल्याची माहितीही गुरमिंदर सिंग यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

बंगालच्या उपसागरात अती तीव्र होणार मोचा चक्रीवादळ : मोचा चक्रीवादळाने सध्या चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मोचा चक्रीवादळ 12 मे रोजी संध्याकाळी मध्य बंगालच्या उपसारगात तीव्र चक्रीवादळात रुपांतरीत होईल. त्यानंतर ते चक्रीवादळ वादळ परत येण्याची शक्यता असल्याचेही भुवनेश्वरचे हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ संजीव द्विवेदी यांनी स्पष्ट केले.

हवामान विभागासह यंत्रणा हाय अलर्टवर : मोचा चक्रीवादळाची तीव्रता 13 मे रोजी शिगेला पोहोचणार आहे. त्यामुळे यंत्रणा सतत देखरेख करत असल्याचेही संजीव द्विवेदी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. आज सकाळी भारतीय हवामान विभागाने ( IMD ) आग्नेय बंगालच्या उपसागरावर खोल दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मोचा चक्रीवादळ तीव्र झाले आहे. या संदर्भात भारतीय तटरक्षक दलाने (ICG) देखील अलर्ट जारी केला आहे. चक्रीवादळ मोचामुळे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांना ( IMD ) हाय अलर्टवर ठेवण्यात आल्याचेही यावेळी संजीव द्विवेदी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा -

1) Adani Hindenburg Dispute : अदाणी हिंडेबर्ग वाद प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात काय होणार फैसला ?

2) Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढल्यानंतर भगतसिंह कोश्यारींचा माध्यमांनाच खोचक प्रश्न, म्हणाले...

3) Imran Khan Set To Appear In IHC : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान होणार इस्लामाबाद उच्च न्यायालयात हजर

Last Updated : May 12, 2023, 2:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.