ETV Bharat / bharat

तृणमूल काँग्रेसने तीन जागा मित्र पक्षांसाठी सोडल्या

शुक्रवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 291 मतदासंघासाठी उमेदवारांची नावे जाहीर केली. यात ममतांनी तीन जागा कलिम्पोंग, दार्जिलिंग आणि कुरसेओंग येथे आपले उमेदवार उतरवले नाहीत. त्यांना या जागा मित्र पक्षांसाठी सोडल्या आहेत.

ममता
ममता
author img

By

Published : Mar 6, 2021, 11:05 AM IST

कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 291 मतदासंघासाठी उमेदवारांची नावे जाहीर केली. यात ममतांनी तीन जागा कलिम्पोंग, दार्जिलिंग आणि कुरसेओंग येथे आपले उमेदवार उतरवले नाहीत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी सरकार आणि राज्यातला विरोधी पक्ष भाजपासाठी चहाचा पट्टा असलेला दार्जिलिंग महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरणार असल्याचे दिसत आहे.

गोरखा जनमुक्ती मोर्चाचे अध्यक्ष बिमल गुरुंग यांनी तीनही जागांवर आपल्या उमेदवारांची घोषणा केली. तर इतर 14 मतदारसंघात ते तृणमूल काँग्रेसला समर्थन देणार आहेत. तर जीजेएमचा प्रतिस्पर्धी गट बेनोय तमांगनेही तीनही जागांवर निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. बेनोय तमांग आणि बिमल गुरुंग यांचे नेतृत्वात जीजेएम गट हा टीएमसीचा सहयोगी आहे. या निवडणुकीमध्ये जर भारतीय जनता पार्टी (भाजपा) बरोबर त्रिकोणी स्पर्धेकडे वळलो, तरी ते एकमेकांविरोधात निवडणूक लढवतील, असे दोन्ही गटाने म्हटलं होते.

टीएमसीने जीजेएमच्या दोन्ही गटांच्या मतदारसंघातून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या मतदारसंघात चांगले वर्चस्व असलेल्या गोरखा नेशनल लिबरेशन फ्रंट (जीएनएलएफ) ने भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपाही हे मतदासंघ जीएनएलएफसाठी सोडू शकते, अशी शक्यता आहे. तराई आणि डुआंग क्षेत्रात गुरुंग गट तृणमूलला समर्थन देणार आहेत. ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्याचा बिमल गुरुंगचा निर्णय टेकडी प्रदेशात टीएमसीसाठी गेम चेंजर ठरू शकेल काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात 8 टप्प्यात मतदान -

पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान 8 टप्प्यात मतदान होणार आहे. मतदानाचा पहिला टप्पा हा 27 मार्चला पार पडेल. तर दुसरा टप्पा हा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल, चौथा टप्पा 10 एप्रिल, पाचवा टप्पातील मतदान 17 एप्रिलला, तर सहावा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिलला आणि आठवा टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला पार पडेल. तर 2 मेला निकाल जाहीर होतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.