नवी दिल्ली - मोदी सरकारविरोधात विरोधकांची फळी एकजूट होत आहे. अशातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. राजकीय हेतुसाठी हे भेट झाल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या निवासस्थानातून बाहेर पडताना तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी माध्यमांसी संवाद साधला. त्या म्हणाल्या, की मी शरद पवारांशी बोलले. ही भेट यशस्वी झाली आहे. आम्ही राजकीय हेतुसाठी भेटलो. लोकशाही टिकली पाहिजे. लोकशाही वाचवा, देश वाचवा, अशी आमची घोषणा आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या मुद्द्यांनाही पाठिंबा देत आहोत. दर दोन महिन्यांनी आम्ही भेटणार आहोत.
हेही वाचा-30 जुलै राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज पोटाचा त्रास जाणवेल; जाणून घ्या बाकी राशींचे भविष्य
भेट होणार असल्याची शरद पवारांनी मुंबईत दिली होती माहिती-
मुंबईत माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले होते, की ममता बॅनर्जी यांनी मागील आठवड्यात फोन केला होता. त्यांनी दिल्ली दौऱ्याची माहिती दिली. तसेच मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. उद्या, दिल्लीत आमची भेट होऊ शकते, असे मला वाटते.
हेही वाचा-CBSE 12 वीचा लागला 99% निकाल, यावर्षीही मुलींचीच बाजी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी तिसऱ्यांदा विराजमान झालेल्या ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची यापूर्वी भेट घेतली आहे. तृणमूल पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी या लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजाविण्याच्या तयारीत आहेत.
2024 मध्ये इतिहास घडेल-
ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत भेटीत 28 जुलैला महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, की भाजप सध्या मजबूत स्थितीत आहे, मात्र विरोधक त्यापेक्षाही मजबूत असतील. 2024 मध्ये इतिहास रचला जाईल अशी आम्हाला आशा आहे. राजकारणात गोष्टी बदलत असतात. जेव्हा राजकीय वादळ येतं आणि स्थिती हाताळणे कठिण होते तेव्हा मोठे बदल होतात. जे केंद्र सरकारला विरोध करतात, त्यांच्याकडेच काळा पैसा आहे का असा सवालही ममतांनी यावेळी विचारला.