बेळगावी (कर्नाटक) - जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील तहसीलदार कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या ग्राम लेखापाल दारुच्या नशेत आढळले आहे. संजू बेन्नी, असे त्या लेखापालाचे नाव आहे.
यापूर्वीही संजूने सौंदत्ती तालुक्यातील गोरावनकल्ला गावात ग्राम लेखापाल म्हणून काम करत असतानाही ते सतत दारुच्या नशेत कर्तव्यावर येत होते. यामुळे त्यांची तहसीलदार कार्यालयात बदली करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या वागण्यात कोणताच बदल झाला नाही. त्या ठिकाणीही ते मद्य प्राशन आले व कार्यालयाच्या आवारातच आडवे झाले. संजू बेन्नी यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप आहेत. संजू बेन्नी यांच्यावर कारवाई न करणाऱ्या तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याविरोधात स्थानिकांनी रोष व्यक्त करत असून ग्राम लेखापालावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. तहसीलदार कार्यालयासमोर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ग्राम लेखापालाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.