लखनौ Verdict In Murder Case : महिलेच्या खून प्रकरणी न्यायालयानं तब्बल 49 वर्षानंतर फैसला केला असून 80 वर्षाच्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या ( woman Murder Case ) आरोपीला न्यायालयानं 20 हजार रुपयाचा दंडही ठोठावला आहे. दंड न भरल्यास एका वर्षाची अतिरिक्त शिक्षा सुनावण्यात आली आहे. महेंद्र सिंह असं न्यायालयानं शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचं नाव आहे. महेंद्र सिंहनं 14 सप्टेंबर 1974 रोजी नरखी इथं हा खून केला होता.
महिलेचा केला होता निर्घृण खून : नारखी इथं 14 सप्टेंबर 1974 रोजी महेंद्र सिंह यानं मीरा देवी यांच्या आईचा गोळ्या झाडून निर्घृण खून केला होता. या खुनामुळे तत्कालिन आग्रा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. आईचा खून केल्यामुळे मीरा देवी यांनी महेंद्र सिंह याच्याविरोधात नारखी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी महेंद्र सिंह याच्या मुसक्या आवळून या प्रकरणाचा तपास सुरू केला.
अगोदर आग्रा न्यायालयात प्रलंबित होतं प्रकरण : महेंद्र सिंह यानं महिलेचा खून केल्यानंतर या प्रकरणी आग्रा न्यायालयात सुनावणी सुरू होती. तत्कालिन जिल्हा असल्यानं आग्र्यातील जिल्हा न्यायालयात सुरु होतं. मात्र त्यानंतर नारखी हा जिल्हा उत्तरप्रदेश राज्यात समाविष्ठ करण्यात आल्यानं हे प्रकरण फिरोजाबाद न्यायालयाकडं सोपवण्यात आलं.
आरोपी 80 वर्षाचा झाल्यानंतर आला निर्णय : महेंद्र सिंह या आरोपीनं नारखी इथं महिलेचा गोळ्या झाडून खून केल्यानं मोठी दहशत पसरली होती. त्यानंतर हे प्रकरण अगोदर आग्रा न्यायालयात प्रलंबित होतं. नारखी उत्तरप्रदेशचा भाग झाल्यानंतर हे प्रकरण फिरोजाबाद न्यायालयात वर्ग करण्यात आलं. फिरोजाबाद न्यायालयात वर्ग झाल्यानंतर या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जितेंद्र गुप्ता यांच्या न्यायालयानं सुनावणी घेत फैसला सुनावला. न्यायालयानं आरोपी महेंद्र सिंह याला जन्मठेप सुनावली आहे. न्यायालयानं तब्बल 49 वर्षानंतर ही शिक्षा सुनावली असून मारेकरी महेंद्र सिंह आता 80 वर्षाचा आहे. तक्रारदार मीरा देवी यांच्या बाजुनं अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील श्रीनारायण शर्मा यांनी त्यांची बाजू मांडली. या प्रकरणात अनेक साक्षीदार तपासण्यात आले आहेत. अनेक पुरावे न्यायालयासमोर मांडण्यात आले. त्या पुराव्याच्या आधारे न्यायालयानं महेंद्र सिंहला दोषी ठरवलं, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील श्रीनारायण शर्मा यांनी दिली.
हेही वाचा :
Thane Crime: चार्जरच्या वायरने झोपलेल्या मित्राचा गळा आवळून खून, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या