वडोदरा - वडोदरा येथील क्षमा बिंदू ( Kshama Bindu ) ही स्वत:शीच विवाह करणार असल्याने देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र, आधार कार्डवर नाव वेगळे लिहिल्याने ( Vadodara Girl Marriage controversy ) आज नवा वाद निर्माण झाला आहे.
वडोदरा शहरातील सुभानपुरा भागात राहणाऱ्या एका तरुणीने स्व-विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. वडोदरा शहरातील भाजप उपाध्यक्षांनी ( BJP vice president Vadodara ) तर या मुलीचे लग्न वडोदरा शहरातील कोणत्याही मंदिरात होऊ दिले जाणार नाही, असे सांगितले आहे. दुसरीकडे, क्षमा बिंदूचे आधार कार्ड ( Soumya Dubey Aadhar card ) समोर आले आहे. या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. कारण आधार कार्डमध्ये सौम्या दुबे असे नाव आहे. आता हे आधार कार्ड बरोबर आहे की नाही याची चौकशी सुरू आहे.
स्वतःच लग्न करण्याची घोषणा करणाऱ्या क्षमाला अनेकांनी विरोध सुरू केला आहे. तिच्या नावाच्या आधार कार्डासमोर सौम्या दुबेचे नाव लिहिलेले दिसत आहे. अशा परिस्थितीत ती आपली ओळख का लपवत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, हे आधार कार्ड सौम्या उर्फ क्षमाचे आहे का, हा तपासाचा विषय आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यास धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-Bitcoin: बिटकॉईनच्या दरात घसरण.. जाणून घ्या आजचे दर
हेही वाचा-हैदराबाद - आजोबांच्या मोबाईलवर फ्री फायर गेम खेळून उडवले ३६ लाख रुपये