ETV Bharat / bharat

उत्तरकाशीत बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू, 800 मिमीचे सहा पाईप टाकले - सिल्क्यरा बोगद्यात 800 मिमीचे सहा पाईप

Uttarkashi Silkyara Tunnel Rescue : उत्तरकाशी सिलक्यारा बोगद्यात 11 व्या दिवशीही बचावकार्य सुरू आहे. 11 व्या दिवसापर्यंत सिल्क्यारा बोगद्यात 800 मिमीचे सहा पाईप टाकण्यात आले आहेत. सिलक्यारा बोगद्यात ३६ मीटरपर्यंत खोदकाम करण्यात आलं आहे. भूस्खलनाचा ढिगारा बोगद्यात 60 मीटरपर्यंत पसरला आहे. अशा स्थितीत ड्रिलिंग केल्यास लवकरच यश मिळू शकतं.

Uttarkashi Silkyara Tunnel Rescue
बोगद्यात 800 मिमीचे सहा पाईप टाकण्यात आले
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 22, 2023, 3:35 PM IST

Uttarkashi Silkyara Tunnel Rescue

उत्तरकाशी (उत्तराखंड) Uttarkashi Silkyara Tunnel Rescue : सिलक्यारा बोगद्यात 41 कामगार अडकले आहेत. या बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी मंगळवारी रात्रभर ड्रिलिंगचं काम सुरू होतं. बोगद्यात आत्तापर्यंत सहा 800 मिमी पाईप ऑगर मशीननं टाकण्यात आले आहेत. सिलक्यारा बोगद्यात 36 मीटरपर्यंत खोदकाम करण्यात आलं असून सातव्या पाईपचं वेल्डिंगचं काम सुरू आहे. ड्रिलिंग सकारात्मक दिशेनं जात आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास बचाव कार्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सिलक्यारा बोगद्यात कोसळली दरड : महामार्गावर निर्माणाधीन सिलक्यारा बोगद्यात 12 नोव्हेंबरला भूस्खलन झाल्यानं 41 मजूर आत अडकले होते. या कामगारांना वाचवण्यासाठी आधी ढिगारा हटवण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र प्रयत्नांना यश मिळू शकलं नाही. त्यानंतर ऑगर मशिननं खोदकाम सुरू करण्यात आलं. केवळ 7 मीटर ड्रिलिंग केल्यानंतर मशीनची क्षमता कमी असल्याचं आढळल्यानं ते काढावं लागलं. यानंतर कामगारांच्या बचावासाठी अमेरिकन ऑगर मशीननं हे काम सुरू करण्यात आलं.

कृती आराखड्यावर काम सुरू : अमेरिकन ऑगर मशीनच्या सहाय्याने बोगद्यात ड्रिलिंग करताना कंपन आणि दरड पडण्याचा धोका होता. यानंतर खोदकामही बंद करण्यात आलं आहे. या मशिनने 22 मीटर खोदकाम केल्यानंतर काम थांबवावं लागलं. यानंतर कामगारांच्या सुरक्षित सुटकेसाठी इतर पर्यायांवर काम सुरू झालं. त्याअंतर्गत 6 कृती आराखड्यांवर काम सुरू आहे.

पाईप वेल्डिंगसाठी लागणारा वेळ : सायंकाळी उशिरा केंद्र सरकारचे अतिरिक्त सचिव महमूद यांनी माहिती दिली की, शुक्रवारी सकाळपर्यंत बोगद्याच्या ढिगाऱ्यात ऑगर मशीनद्वारे 22 मीटर900 मिमीची पाईप टाकण्यात आली. यानंतर कामात अडथळा निर्माण झाल्याने काम थांबवावं लागलं. पाच दिवस तज्ज्ञांच्या चाचण्यांनंतर मंगळवारी ८०० मिमी पाइप टाकण्याचं काम सुरू झालं. पाईप जोडण्यासाठी वेळ लागत आहे.

बोगद्यात सहा 800 मिमीचे पाईप टाकण्यात आले : त्यांनी सांगितलं की, 900 मिमी पाईप टाकल्यानं अधिक कंपन होत आहे. अशा स्थितीत पाईपची व्याप्ती कमी करण्यात आली आहे. 22 मीटर 800 मिमीचे पाईप टाकल्यानंतर पुन्हा ड्रिलिंग केलं जाईल. खोदकाम करताना कोणतेही यंत्र किंवा खडक न आढळल्यास बुधवारी दुपारपर्यंत पाईप टाकण्याचं काम मोठ्या प्रमाणात पूर्ण होईल. ड्रिलिंग दरम्यान पुढील 22 ते 45 मीटर अंतर सर्वात महत्वाचं असेल. यादरम्यान अडचणीची येण्याची सर्वाधिक शक्यता असते.

हेही वाचा -

  1. मुकेश अंबानी यांच्याकडून ममता बॅनर्जींचे कौतुक, बंगालमध्ये 'इतक्या' हजार कोटींच्या गुंतवणुकीची केली घोषणा
  2. नागपुरातून अपहरण झालेल्या मुलाची मध्य प्रदेशमधून सुटका, मजूर जोडप्याला अटक होऊनही अपहरणाचे कारण गुलदस्त्यात!
  3. बोगद्यातील मजुरांच्या सुटकेकरिता काम करणारे कोण आहेत प्रोफेसर डिक्स, बचावपथकाच्या मोहिमेत आजपर्यंत काय घडलं?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.