ETV Bharat / bharat

काश्मीर-शोपियामध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांना कंठस्नान - आयजीपी विजय कुमार

दक्षिण काश्मीरच्या शोपियामध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

two terrorists killed in jammu and kashmir search operation at shopian
काश्मीर-शोपियामध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
author img

By

Published : Jul 19, 2021, 2:55 AM IST

श्रीनगर - दक्षिण काश्मीरच्या शोपियामध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितलं की, सुरक्षा दलाच्या जवानांनी खात्मा केल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर ए तोएबा संघटनेचा टॉप कमांडर इशफार डार उर्फ अबू अकरम याचा समावेश आहे. दरम्यान, अकरम काश्मीर घाटीत चार वर्षांपासून दहशतवादी कारवायामध्ये सक्रिय होता.

सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात काल रविवारपासून चकमक सुरू होती. यात लष्कर ए तोएबा या दहशतवादी संघटनेच्या एक टॉपच्या कमांडरसह दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी घेरले होते. दहशतवादी रात्रीचा फायदा घेऊन पळून जाऊ नये, यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला होता.

पोलिसांनी सांगितलं की, चक ए सादिक खान परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाली. तेव्हा सुरक्षा दलाच्या जवानांनी या परिसराला वेढा घालत शोधमोहिम हाती घेतली. जवांनानी प्रत्येक घरात शोध सुरू केला. तेव्हा लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर अचानक गोळीबार सुरू केला.

सुरक्षा दलाच्या जवांनानी दहशतवाद्यांना आत्मसर्पण करण्यास सांगितले. तरी देखील दहशतवाद्यांनी गोळीबार सुरूच ठेवला. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. दरम्यान, मागील आठवड्यात लष्कर ए तोएबाच्या दहशतवाद्यांसह घाटीतील अनेक दहशतवाद्यांचा खात्मा सुरक्षा दलाच्या जवानांनी केला होता.

हेही वाचा - नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड

हेही वाचा - गुरुग्राममध्ये तीन मजली इमारत कोसळली; अनेकजण अडकले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.