ETV Bharat / bharat

Horses Died By Bees Attack : मधमाशांच्या हल्ल्यात दोन रेसिंग घोड्यांचा मृत्यू; कोट्यावधींचे नुकसान - मधमाशांचा घोड्यांवर हल्ला

बुधवारी या दोन घोड्यांना चरायला सोडण्यात आले होते. मात्र दुपारी एक वाजताच्या सुमारास अचानक हजारो मधमाशांनी दोन्ही घोड्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन घोडे घायाळ झाले आणि जमिनीवर पडून दगावले. (racing Horses Died By Bees Attack). या दोघांच्या मृत्यूमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. (horses died by bees attack in Karnataka). (bees attack on horses).

Horse
घोडा
author img

By

Published : Jan 7, 2023, 7:50 PM IST

तुमकुरू (कर्नाटक) : कर्नाटकच्या तुमकुरू जिल्ह्यातील कुनिगल स्टड फार्ममध्ये मधमाशांच्या हल्ल्यात कोट्यवधी रुपये किमतीचे दोन नर घोडे मरण पावले आहेत. (racing Horses Died By Bees Attack). हे घोडे आयर्लंड आणि अमेरिका येथील होते. मधमाश्यांच्या हल्ल्यात आयर्लंडचा 10 वर्षांचा सॅनस पर अक्चम नावाचा घोडा आणि अमेरिकेचा 15 वर्षांचा एअर सपोर्ट नावाचा घोडा मरण पावला आहे. (horses died by bees attack in Karnataka). (bees attack on horses).

चरायला गेले असताना हल्ला : बुधवारी नेहमीप्रमाणे या दोन घोड्यांना चरायला सोडण्यात आले होते. मात्र दुपारी एक वाजताच्या सुमारास अचानक हजारो मधमाशांनी दोन्ही घोड्यांवर हल्ला केला. मधमाश्यांच्या हल्ल्यात दोन घोडे घायाळ झाले आणि जमिनीवर पडून दगावले. हा प्रकार कामगारांच्या लक्षात आला आणि त्यांनी डॉक्टरांना याबद्दल माहिती दिली. डॉक्टरांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत घोड्यांवर उपचार केले. मात्र उपचारांना प्रतिसाद न दिल्याने गुरुवारी रात्री दहा वाजता सॅनस पर अक्चमचा मृत्यू झाला. तर एअर सपोर्ट हॉर्सचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. या दोघांच्या मृत्यूमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

शर्यतीत वापरले जाणारे घोडे होते : फार्मचे व्यवस्थापक लोकेश म्हणाले, 'अमेरिकन घोडा एअर सपोर्ट याने व्हर्जिनिया डर्बी आणि पिलग्रामा स्टेक्स, ट्रान्सलेनिया स्टेक्स, सेकंड युनायटेड नेशन्स स्टेक्स, थर्ड अमेरिकन टर्फ स्टेक्स, सेकंड हिल प्रिन्स स्टेक्स या आणि अशा अनेक रेसमध्ये भाग घेतला होता. यातून त्याने लाखो रुपये कमावले आहेत. तर आयर्लंडच्या 10 वर्षीय सॅनस पेर आचमने तीन वेळा पंचतारांकित शर्यत जिंकली आहे. घोड्यांच्या शर्यतीत चांगली कामगिरी करणारे हे दोन घोडे सहा वर्षांपूर्वी URBB ने प्रत्येकी एक कोटी रुपयांना खरेदी केले होते. घोड्यांच्या या जातीपासून फॉल्स (घोड्यांचे शावक) तयार केले जात होते.'

अनेक शावकांना जन्म दिला आहे : या घोड्यांनी शेकडो फॉल्सला जन्म दिला आहे. त्यांना विविध राज्यांतून आणि देशांतून लाखो रुपयांना विकत घेऊन शर्यतींसाठी वापरण्यात आले आहे. सरकारने URBB ला 30 वर्षांच्या कालावधीसाठी लीज दिली होती. हा भाडेपट्टा कालावधी गेल्या सप्टेंबरमध्ये संपला, परंतु पुन्हा URBB ला काही दिवसांचा अवधी लागला. त्याचवेळी या दोन घोड्यांवर मधमाश्यांनी हल्ला केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.