ETV Bharat / bharat

Congress councilors join AAP: दिल्लीत काँग्रेसला मोठा झटका.. निवडणूक संपताच नगरसेवकांचा आम आदमी पक्षात प्रवेश

Congress councilors join AAP: एमसीडीची निवडणूक MCD Election संपताच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी प्रदेश काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष अली मेहंदी यांच्यासह काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनीही आम आदमी पक्षात प्रवेश केला. त्यांच्या भागात काम करायचे आहे, त्यामुळेच पक्षात प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. Two newly elected Congress councilors join AAP

Two newly elected Congress councilors join AAP
दिल्लीत काँग्रेसला मोठा झटका.. निवडणूक संपताच नगरसेवकांचा आम आदमी पक्षात प्रवेश
author img

By

Published : Dec 9, 2022, 7:17 PM IST

नवी दिल्ली : Congress councilors join AAP: एमसीडीची निवडणूक MCD Election संपताच नगरसेवक आणि नेत्यांची फोडाफोडी सुरू झाली आहे. शुक्रवारी दोन नवनिर्वाचित नगरसेवकांनी काँग्रेसचा 'हात' सोडून 'झाडू' पकडला. त्यांच्यासोबत काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष अली मेहंदी यांनीही आपमध्ये प्रवेश केला. आम आदमी पार्टीच्या कार्यालयात एमसीडीचे प्रभारी आणि प्रवक्ते दुर्गेश पाठक यांनी तिन्ही नेत्यांचा पक्षात समावेश केला. यासह एमसीडीमध्ये आपचे आता १३६ नगरसेवक झाले आहेत. Two newly elected Congress councilors join AAP

250 जागांसह MCD मध्ये AAP ने 134 जागा जिंकल्या आहेत. म्हणजेच त्यांच्याकडे बहुमताचा आकडा आहे. आता महापौरही आपचाच होणार. अली मेहंदी म्हणाले की, मुस्तफाबाद आमच्यासाठी सर्वोपरि आहे. येथे एकत्र काम करण्यासाठी आजच सामील झालो आहे.

दिल्लीत काँग्रेसला मोठा झटका.. निवडणूक संपताच नगरसेवकांचा आम आदमी पक्षात प्रवेश

ज्यांना आपल्या भागात काम करायचे आहे, त्यांनी एकत्र या: आपचे प्रवक्ते दुर्गेश पाठक म्हणाले की, एमसीडीमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की, आम्हाला भांडायचे नाही, भांडण करायचे नाही. एकत्र काम करावे लागेल. ते म्हणाले की, काँग्रेसच्या दोन नगरसेवकांना त्यांच्या भागात रस्ते, नाली आणि इतर विकासकामे करायची आहेत, म्हणून ते 'आप'मध्ये दाखल झाले. आम आदमी पक्षाचा कामावर विश्वास आहे, ज्यांना आपल्या भागात काम करून घ्यायचे आहे, काँग्रेस असो वा भाजप, सर्वांचे स्वागत आहे, असे ते म्हणाले.

सबीला आणि नाझिया यांनी 'झाडू' धरला: मुस्तफाबादमधून काँग्रेसच्या तिकीटावर नगरसेवक झालेल्या सबिला बेगम यांनी प्रकृती अस्वास्थ्य असतानाही शुक्रवारी आपमध्ये प्रवेश केला. तापामुळे त्या माध्यमांशी बोलल्या नाहीत. तर, ब्रिजपुरी वॉर्डातून नाझिया खातून यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजयी झाल्या, त्याही 'आप'मध्ये दाखल झाल्या. त्या म्हणाल्या की, एमसीडीमध्ये फारसे बजेट नसल्यामुळे त्या त्यांच्या क्षेत्रात काम करण्यासाठी आपमध्ये सामील झाल्या आहेत. आमच्या भागात विकासकामे होतील या आशेने आम्ही आम आदमी पक्षाशी जोडलो आहोत, असे त्या म्हणाल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.