नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी 9 वर्षांच्या बलात्कार पीडित मुलीच्या आई-वडिलांसोबत झालेल्या भेटीचे छायाचित्र ट्विटर अकाऊंटवर शेअर केल्यामुळे त्यांचे खाते लॉक करण्यात आले आहे. यावरून टि्वटर विरूद्ध काँग्रेस असे चित्र निर्माण झाले आहे. टि्वटर खाते लॉक केल्यावर राहुल गांधींचा एक व्हिडिओ युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही यांनी शेअर केला आहे.
-
ये हमला राहुल गांधी पर नही,
— Srinivas BV #UnlockRahulGandhi (@srinivasiyc) August 13, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
बल्कि हमारे देश के लोकतांत्रिक ढांचे पर है । pic.twitter.com/njs4V5dEVJ
">ये हमला राहुल गांधी पर नही,
— Srinivas BV #UnlockRahulGandhi (@srinivasiyc) August 13, 2021
बल्कि हमारे देश के लोकतांत्रिक ढांचे पर है । pic.twitter.com/njs4V5dEVJये हमला राहुल गांधी पर नही,
— Srinivas BV #UnlockRahulGandhi (@srinivasiyc) August 13, 2021
बल्कि हमारे देश के लोकतांत्रिक ढांचे पर है । pic.twitter.com/njs4V5dEVJ
शेअर केलेल्या व्हिडिओत राहुल गांधी यांनी टि्वटरच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली. 'माझे खाते लॉक करणे, म्हणजे माझ्या लाखो फॉलोवर्सचा अपमान आहे. टि्वटर देशातील राजकारण ठरवण्याचे काम करत आहे. हा लोकशाहीच्या मुळावर हल्ला आहे. हा फक्त राहुल गांधींवर हल्ला नाही. तर हा लाखो लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. माझे खाते बंद करून एका कंपनीने राजकीय प्रकियेमध्ये हस्तक्षेप केला आहे. व्यवसाय करणारी एक कंपनी राजकारण ठरवत आहे. एका राजकीय नेता म्हणून मला हे योग्य वाटत नाही. राजकारणात एखाद्याची बाजू घेणे, हे एखाद्या कंपनीसाठी धोकादायक आहे', असे ते म्हणाले.
'देशाच्या लोकशाहीवर हल्ले होत आहे. संसदेत विरोधकांना बोलू दिले जात नाही. माध्यमांवर नियंत्रण मिळवलं आहे. या सर्वांत आपली बाजू मांडण्यासाठी टि्वटर हे एक माध्यम होते. मात्र, आता तसे राहिले नाही. खाते बंद करून टि्वटर हे न्युट्रल प्लॅटफार्म नसल्याचे सिद्ध झाले आहे', असे राहुल म्हणाले.
राहुल गांधींच्या वक्तव्यावर ट्विटरकडून प्रतिक्रिया आली आहे. सोशल मीडिया कंपनीने पुन्हा एकदा गुरुवार जारी केलेल्या आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आहे. पक्षपातीपणाशिवाय कारवाई केल्याचे टि्वटरने म्हटलं. भारत सरकारच्या नियमांचे आणि कायद्यांचे उल्लंघन करणारे चित्र शेअर केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. आमचे ध्येय प्रत्येक व्यक्तीची गोपनीयता आणि सुरक्षिततेची काळजी घेणे आहे, असे टि्वटरने म्हटलं.
POCSO कायद्यांचे उल्लंघन -
गेल्या आठवड्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बलात्कार आणि हत्या झालेल्या दलित मुलीच्या कुटुंबीयांची दिल्लीतील नांगल गावात जाऊन घेतली होती. या भेटीचे छायाचित्र त्यांनी टि्वटरवर शेअर केले होते. यात पीडित मुलीच्या कुटुंबीयांची पालक दिसत होते. यातून त्यांची ओळख उघड झाली होती. हे POCSO कायद्यानुसार चुकीचे आहे. म्हणून टि्वटरने राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांचे खाते लॉक केले आहे.
काँग्रेस विरोधात टि्वटर -
राहुल गांधी यांचे खाते लॉक केल्यानंतर काँग्रेसकडून #TwitterBJPseDarGaya, #IStandWithRahulGandhi आणि #UnlockRahulGandhi हे हॅशटॅग चालवण्यात येत आहे. तसेच काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह इतर काँग्रेस नेत्यांनी आपल्या प्रोफाइलमध्ये राहुल गांधींचा फोटो लावला आहे.
हेही वाचा - मोदी सरकारच्या दबावामुळे काँग्रेस नेत्यांचे ट्विटर अकाऊंट बंद, नाना पटोलेंचा आरोप