कोटद्वार : तुर्कीतील विनाशकारी भूकंपानंतर बेपत्ता झालेल्या कोटद्वार येथील विजय पोखरियाल यांचा मृतदेह सापडला आहे. विजय 22 जानेवारीला बंगळुरूहून तुर्कीला रवाना झाले होते. विजय पोखरियाल त्याच्या कंपनीच्या कामानिमित्त दोन महिन्यांसाठी तुर्कीला गेले होते. विजय तुर्कीतील अंतल्या शहरातील हॉटेल अवसार येथे थांबले होते. या भूकंपात हॉटेल कोसळ्याने त्यांचा दबून जागीच मृत्यू झाला आहे.
मृतदेह तीन दिवसांने भारतात : या संदर्भात विजय पोखरियाल यांच्या मोठ्या भावाने सांगितले की, आज त्यांना तुर्की दूतावासाकडून माहिती मिळाली की विजयचा मृतदेह हॉटेलच्या ढिगाऱ्यातून दबलेल्या अवस्थेत सापडाल आहे. विजय बेपत्ता पोखरियाल झाल्यापासून त्याचा मोठा भाऊ भारतीय दूतावासाच्या सतत संपर्कात होता. भारतीय दूतावासाने विजयच्या कुटुंबीयांना सांगितले की विजयचा मृतदेह तीन दिवसांत भारतात आणण्यात येईल.
भूकंपामुळे विमानतळाच्या धावपट्टीचे नुकसान : कोटद्वार येथील रहिवासी असलेला विजय 22 जानेवारी रोजी बंगळुरूहून तुर्कीला गेले होते. तुर्कस्तानमध्ये झालेल्या भीषण भूकंपामुळे विजयच्या कुटुंबीयांशी संपर्क होऊ शकला नव्हाता. विजयचा मोठा भाऊ अरुण पोखरियाल यांनी सांगितले की, तुर्कस्तानमध्ये भूकंप येण्यापूर्वी दररोज फोनवर व्हिडिओ कॉलद्वारे बोलणे होत होते. मात्र, 6 फेब्रुवारीपासून विजयशी संपर्क होऊ शकला नाही. विजयच्या भावाने सांगितले की, तुर्कीच्या एका शहरातून मृतदेह रस्त्याने इस्तंबूलला आणला जात आहे. येथून 22 तासानंतर मृतदेह भारतात येण्याची शक्याता आहे. तुर्की शहरात झालेल्या भूकंपामुळे विमानतळाच्या धावपट्टीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मृतदेह रस्त्याने आणला जात आहे.