ETV Bharat / bharat

दिल्लीच्या विधानसभेच्या खाली एक गुप्त बोगदा; लवकरच पर्यटकांसाठी होणार खुला - दिल्ली विधानसभेत बोगदा

दिल्ली विधानसभेच्या आतील (लाल किल्ल्याकडे जाणारा) बोगदा सामान्य लोकांसाठी खुला करण्यात येणार आहे.

Tunnel reaching Red Fort discovered at Delhi Legislative Assembly ready to be opened for people
बोगदा
author img

By

Published : Sep 3, 2021, 8:52 AM IST

नवी दिल्ली - लाल किल्ल्याकडे जाणारा एक बोगदा दिल्ली विधानसभेच्या आत आहे. हा बोगदा सामान्य लोकांसाठी खुला करण्यात येणार आहे. बोगद्याच्या इतिहासाबद्दल स्पष्टता नाही. मात्र, ब्रिटिशांनी हा बोगदा वापरला असावा, असे दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष राम निवास गोयल म्हणाले.

दिल्ली विधानसभेच्या आतील (लाल किल्ल्याकडे जाणारा) बोगदा सामान्य लोकांसाठी खुला करण्यात येणार आहे. पर्यटन विभागाला शनिवारी आणि रविवारी लोकांना विधानसभेत आणण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्यानुसार विधानसभेची रचना तयार करण्यात येत आहे. येत्या 26 जानेवरी किंवा 15 ऑगस्टपर्यंत हा लोकांसाठी खुला होईल, असे राम निवास गोयल यांनी सांगितले.

बोगद्यांची लांबी तब्बल 7 किलोमीटर -

माहितीनुसार, दिल्ली विधानसभेच्या इमारतीच्या मागच्या बाजुला फाशी देण्याचं ठिकाण बनवण्यात आलं होतं. इथं लाल किल्ल्यात बंदिस्त करून ठेवलेल्या क्रांतीकारकांना या सुरुंगातून दिल्ली विधानसभेच्या मागच्या बाजुच्या फाशीघरात नेऊन फाशी दिली जात असे. या बोगद्यांची लांबी तब्बल 7 किलोमीटर आहे.

हेही वाचा - 'हे' आहेत जगातील सर्वाधिक लांबीचे बोगदे...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.