मुंबई - रेल्वे पोलिसांकडून एका 21 वर्षीय युवकाचा शोध घेतला जात असून, सोशल माध्यमांवर या युवकाचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झालेला आहे. अंगावर काटा आणणार्या व्हिडिओमध्ये युवक रेल्वे रुळावर बसलेला आहे. त्याच्या हातामध्ये एक पिस्तूल असून तो कपाळावर लावून हा व्हिडिओ रेकॉर्ड करतानाचे दृश्य व्हिडिओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना या युवकाच्या मागून लोकल रेल्वे जात असल्याचेही पाहायला मिळत आहे. सविस्तर वाचा..
कोलकत्ता - आज म्हणजेच 10 जून रोजी या वर्षाचे पहिले सूर्यग्रहण होणार आहे. हे सूर्यग्रहण सूर्यास्ताच्या काही काळापूर्वी फक्त अरुणाचल प्रदेश आणि लडाखच्या काही भागात दिसेल. हे एक कंकणाकृती सूर्यग्रहण असेल आणि जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा ही खगोलीय घटना घडते. एमपी बिर्ला प्लॅनेटेरियमचे संचालक देबिप्रसाद दुरई म्हणाले की, सूर्यग्रहण केवळ अरुणाचल प्रदेश आणि लडाखमधील काही भागांतूनच दिसेल. सविस्तर वाचा..
नवी दिल्ली - दिल्ली हाईकोर्टाने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या जीवनावर चित्रपट किंवा डॉक्युमेंट्री बनविण्यावर बंदी घालण्याची मागणी फेटाळण्यात आली आहे. ही याचिका सुशांतचे वडील कृष्ण किशोर सिंह यांनी केली होती. सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकून कोर्टाने 2 जून रोजी या प्रकरणात निर्णय राखून ठेवला होता. जस्टिस संजीव नरुला यांनी हा निर्णय दिला. सविस्तर वाचा..
मुंबई- शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मालाडमध्ये इमारत कोसळण्याची दुर्घटना घडली. बुधवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास मालाड पश्चिमेला न्यू कलेक्टर कंपाऊड परिसरात एक रहिवाशी इमारत कोसळली. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी इमारत दुर्घटनेप्रकरणी इमारतीचा मालक आणि ठेकेदाराविरोधात मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. सविस्तर वाचा..
नागपूर - एलपीजी गॅस सिलेंडरमधील गॅस लिक झाल्याने शेजारी-शेजारी असलेल तीन घरे जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. जिल्ह्यातील काटोल तालुक्याच्या डोरली भिंगारे गावात घडलेल्या या दुर्घटनेत सुदैवाने जीवतहानी झालेली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे. सविस्तर वाचा..
मुंबई - मुंबईतील मालाडमध्ये मुसळधार पावसामुळे एका इमारतीचा भाग कोसळून 11 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मालाड मालवणी भागात एक इमारत दुसऱ्या इमारतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत 11जणांचा मृत्यू तर 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल असून बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेवरून आता भाजप नेते राम कदम यांनी मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मालाडमधील घटनेत 11 लोकांचा मृत्यू ही शिवसेनाशासित बीएमसीकडून केलेली योजनाबद्ध हत्या असल्याचा घणाघाती आरोप भाजप आमदार राम कदम यांनी केला आहे. सविस्तर वाचा..
अमरावती - विदर्भात अद्यापही मान्सून सक्रीय व्हायचा असला तरी मान्सूनपूर्व पाऊस मात्र अनेक भागात पडत आहे. विदर्भाचे काश्मीर म्हणून ओळख असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदऱ्यात मात्र मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे चिखलदऱ्यात काल रात्री आणि आज पहाटे सुद्धा धुक्याची चादर पसरल्याचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळाले आहे. अनेक दिवसांपासून चिखलदऱ्यात मान्सूनपूर्व पाऊस पडत असल्यामुळे सर्वत्र हिरवळ पसरायला देखील सुरुवात झाली आहे. सविस्तर वाचा..
ठाणे - नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, यासाठी शिवसेना ठाम असतांना दुसरीकडे विरोधक आणि स्थानिक भूमिपुत्र दिबा पाटील यांच नाव देण्यासाठी आक्रमक होतांना दिसत आहेत. त्यात आता स्थानिक युवक भूमिपुत्र हे देखील रस्तावर उतरत आहेत. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील पाच तरुणांची पंचमहाभूत नावाचा गृप तयार करून त्या गृपद्वारे नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबत खेडोपाडी जावून जनजागृती करत आहेत. सविस्तर वाचा..
मुंबई - मंगळवारी 8 जून रोजी, एका अज्ञात व्यक्तीकडून शब्बीर आलमा मोउद्दीन शेख या 28 वर्षीय तरुणाला मारहाण करण्यात आली होती. एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या, धनराज मिल कंपाऊंड या ठिकाणीं शाह अँड नाहर इंडस्ट्रियल प्रिमायसेस मध्ये ही घटना घडली. मारहानी दरम्यान या युवकास इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून, फायर पॅसेजमधून खाली ढकलून त्याचा खून करण्यात आला आहे. सविस्तर वाचा..
पुणे - कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने होत असताना त्याचे आर्थिक, सामाजिक, परिणाम ही समोर येत आहे. या व्हायरसमुळे गेल्या दीड वर्षांपासून अनेक उद्योग व्यवसाय ठप्प झाल्यामुळे अनेकांसमोर उदरनिर्वाहाचे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या इंडस्ट्रीपैकी एक म्हणजे पर्यटन. गेल्या दीड वर्षात लॉकडाऊननंतर अनलॉकमध्ये काही व्यवसाय सुरू झाले आणि परत दुसऱ्या लाटेत बंद झाले. आत्ता निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुन्हा व्यवसाय सुरू झाले. पण गेल्या दीड वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील पूर्णच व्यवसाय ठप्प असल्याने या व्यवसायासमोर अनेक अडचणी निर्माण झाले आहे. सविस्तर वाचा..