- मुंबई - राज्यात मंगळवारी (दि. 15 जून) नव्या 9 हजार 350 रुग्णांची नोंद झाली असून 388 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सोमवारच्या तुलनेत रुग्णांची संख्या मंगळवारी 1 हजार 200 ने वाढली आहे. राज्यात एकूण 59 लाख 24 हजार 773 इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे. वाचा सविस्तर
- सांगली - कृष्णा नदीच्याकाठी एका अजस्त्र मगरीचे आज दर्शन झाले आहे. सांगली-इस्लामपूर नवीन पुलाजवळ असणाऱ्या काठावर तब्बल 13 फुटी अजस्त्र मगर पाहायला मिळाली. यामुळे नदीकाठी भितीचे वातावरण पसरले आहे. वाचा सविस्तर
- नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेचा दौरा करण्याची शक्यता आहे. त्यांच्या या दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित नसली, तरी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतरच हा दौरा होईल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. वाचा सविस्तर
- मुंबई - महाविकास आघाडी सरकारच्या वतीने राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावाची यादी ६ नोव्हेंबर २०२०ला राज्यपाल यांना सादर केली होती. यादी सादर करुन ७ महिने उलटले तरीही राज्यपालांनी नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष निर्माण झाला आहे. महाविकास आघाडी सरकारने विधानपरिषद सदस्य नेमणूक करण्यासाठी ज्या १२ लोकांची नावे पारित करुन राज्यपालाकडे मंजुरीसाठी पाठविली होती, ती यादी माहिती अधिकारात उपलब्ध नसल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिली होती. यावर आज राज्यपालांच्या उपसचिव असलेल्या प्राची जांभेकर यांनी सुनावणी घेतली. यावेळी राज्यपालांकडे यादीसहित संपूर्ण माहिती असल्याचे समोर आले आहे. वाचा सविस्तर
- मुंबई - अँटिलिया स्फोटक प्रकरणात आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी एनआयएने दोन जणांना अटक केली आहे. संतोष शेलार आणि आनंद जाधव अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी एका आरोपीला लातूर येथून अटक करण्यात आली आहे. यापैकी या दोघांनाही विशेष न्यायालयात हजर केले असता, पुढील तपास करण्यासाठी एनआयएने 21 जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात त्यांची भूमिका आणि सहभागाबद्दल अधिक माहिती NIA घेत आहे. वाचा सविस्तर
- मुंबई - एचपीसील कंपनीच्या नवीन पेट्रोल पंपचा परवाना काढून देतो, असे तब्बल 45 लाख 37 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी गौरवराज उर्फ रोहित गुप्ता या आरोपीला अटक करण्यात आली. ही कारवाई मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी केली. वाचा सविस्तर
- पुणे - राज्यातील कोरोनाची परिस्थिती संपूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दोन तीन जिल्हे सोडले तर पॉझिटिव्ह रेट कमी होत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. वाचा सविस्तर
- अकोला - आशा कर्मचाऱ्यांचा कामाचा मोबदला अदा न केल्यामुळे महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेकडून एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. आशा स्वयंसेविकांनी महापालिकेत आज निदर्शने केली, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या विरोधात त्यांनी नारेबाजी केली. वाचा सविस्तर
- मुंबई - पूर्वी हिंदी चित्रपटातील हिरो एकाचवेळी चार-चार, पाच-पाच चित्रपटांत काम करायचे. त्यावेळी ते अभिमानाने सांगायचे की ‘मी तीन शिफ्ट्स मध्ये, तीन-चार चित्रपटांमध्ये काम करतोय’. परंतु आताच्या काळात अभिनेते-अभिनेत्री एकावेळी एकाच चित्रपटात काम करताना दिसतात. खरंतर फार वर्षांपूर्वीपासून आमिर खानने नेहमीच एकावेळी एकच चित्रपट हा मंत्र अंगिकारला होता तेव्हा फिल्म इंडस्ट्रीने त्याला वेड्यात काढले होते. आता अख्खे बॉलिवूड त्याचा ‘एकावेळी एकच चित्रपट’ हे ब्रीद वापरतेय. आमिर खानने नेहमीच उत्तम कथानकांना प्राध्यान्य दिले. ‘मेरे पिताजी हमेशा कहाँ करते थे, अगर तुम्हारी कहानी अच्छी है तो तुमको घबरानेकी जरुरत नहीं’, असे आमिरचेने सांगितले. वाचा सविस्तर
- लंडन - भारतीय कसोटी संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा यानं जागतिक कसोटी अजिंक्य स्पर्धेच्या अंतिम सामन्याआधी डरकाळी फोडली आहे. त्याने, भारतीय संघ कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचे म्हटलं आहे. वाचा सविस्तर
Top 10 @ 11 PM रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या... - आजच्या महत्त्वाच्या घडामोडी
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...
Top 10 @ 11 PM रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या...

Last Updated : Jun 15, 2021, 10:58 PM IST