- मुंबई - कोरोना जरा कमी झाला नाही तर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापू लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर आज राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतेच मोदींचे कौतुक केले. त्यांच्याबद्दल नरमाईची भाषा राऊत यांच्या तोंडून ऐकायला मिळाली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात महाविकास आघाडीला धोका नाही, असे विधान शरद पवार यांनी केले. अलिकडच्या काळातील एकूणच राजकीय नेत्यांच्या मुलाखती पाहता नजिकच्या भविष्यात राज्यामध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. सविस्तर वाचा...
- मुंबई - लसींच्या पुरवठ्यावरून सीरम इंस्टिट्युटचे अदर पूनावाला यांना धमकीचे फोन आले होते. या धमकीबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यात आली. मागील सुनावणीत कारवाईचा अहवाल 10 जूनपर्यंत सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यावर आजच्या (शुक्रवार) सुनावणीत पुनावाला यांनी जर सुरक्षा मागितली तर राज्य सरकार द्यायला तयार आहे, अशी राज्य सरकारने उच्च न्यायालयात ग्वाही दिली आहे. त्यामुळे या याचिकेवर आता सुनावणी करण्याचा मुद्दा राहत नाही, असे सांगत मुंबई उच्च न्यायालया ही याचिका निकाली काढली. सविस्तर वाचा...
- चेन्नई - चेन्नई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने आयएल अँड एफएसमधील १ लाख कोटी रुपयांच्या घोटाळ्यात मोठी कारवाई केली आहे. घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार असलेल्या कंपनीच्या माजी चेअरमन रवी पार्थसारथीला पोलिसांनी अटक केली आहे. आयएल अँड एफएसमधील घोटाळ्यामुळे २०१८ मध्ये वित्तीय कंपन्यांमध्ये चलनाच्या वित्त पुरवठ्याची समस्या निर्माण झाली होती. सविस्तर वाचा...
- मुंबई - देशातील विदेशी गंगाजळीने (फॉरेन एक्सचेंज) पहिल्यांदाच 600 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. मागील आठवड्यात 4 जूनपर्यंत 6.842 अब्जने विदेशी गंगाजळीने वाढ झाली आहे. त्यानंतर विदेशी गंगाजळीने आजतागायत सर्वाधिक राहिली आहे. विदेशी चलन मालमत्तेत (फॉरेन करन्सी असेट्स-एफसीए) वाढ झाल्याने विदेशी गंगाजळीत वाढ झाल्याचे आरबीआयच्या आठवडाभरातील आकडेवारीतून दिसून आले आहे. सविस्तर वाचा...
- मुंबई - काही दिवसांपासून मोदी आणि योगी यांच्यामध्ये मतभेदाचे वातावरण असल्याच्या बातम्या देशात आणि उत्तरप्रदेशमध्ये येत आहेत; परंतु कोरोनाकाळातील अपयश झाकण्यासाठी भाजपची ही ठरवून केलेली रणनीती असल्याचा आरोप अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. कोरोनाकाळात उत्तरप्रदेशमधील गंगा नदीत कोरोनाबाधित लोकांचे मृतदेह फेकण्यात आल्याचे भयावह चित्र अख्खा देशाने आणि जगाने पाहिले. यामुळे योगी यांच्या कारभाराचे वाभाडे निघाले. हे अपयश झाकण्यासाठी मोदी विरुद्ध योगी, असे चित्र उभे करण्याचा भाजपचा प्लॅन तयार असल्याचे नवाब मलिक म्हणाले. सविस्तर वाचा...
- अमरावती - शरद पवार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची भेट घेतली असेल तर त्यात वावगे काय. भाजपा विरोधासाठी जर मोट बांधली जात असेल तर ते योग्यच आहे. आम्ही जन्मताच भाजपाचे प्रमुख विरोधीपक्ष आहे. परंतु येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुका आम्ही स्वबळावरच लढणार आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व कोरोना रुग्णालयांना भेट देण्यासाठी पटोले सध्या पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर असून आज ते दर्यापुरात बोलत होते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल यांची प्रशंसा करण्याची प्रमाणपत्र राऊत यांना दिले नाही. पंतप्रधान हे देशाच सर्वोच्च पद आहे. परंतु त्या पदाची गरिमा देखील नरेंद्र मोदींनी संपवून टाकली आहे अशी जळजळीत टीका देखील नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. सविस्तर वाचा...
- अमरावती - भारतीय संविधानाचा अवमान करणाऱ्या नवनीत राणा या पूर्णतः खोटरड्या आहेत. या अनुसूचित जातीसाठी राखीव आणाऱ्या अमरावती मतदार संघात आपण अनुसूचित जातीत मोडतो याचे खोटे प्रमाणपत्र सादर करणाऱ्या नवनीत राणा यांचा खोटारडेपणा उच्च न्यायालायत उघड झाला आहे. आता त्याचे संसदेत बसणेही घटनेचा अवमान असून नवनीत राणा यांना शिक्षा होईपर्यंत आम्ही सोडणार नाही, असा इशारा अमरावतीचे माजी खासदार आनंद अडसूळ यांनी दिला आहे. सलग 8 वर्षे लढा दिल्यावर 5 जूनला आनंद अडसूळ यांच्या बाजूने उच्च न्यायालयाचा निर्णय आल्यावर त्यांनी आज (दि. 11 जून) अमरावतीत येऊन पत्रकार परिषद घेतली. सविस्तर वाचा...
- नागपूर - महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिळून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोंडी करत असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. ते आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा युतीचे सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले. त्याचबरोबर, भाजप आणि शिवसेनेने अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा प्रस्तवा त्यांनी मांडला. सविस्तर वाचा...
- इस्लामाबाद - आज पाकिस्तानी संसदेमध्ये कुलभूषण जाधव यांच्यासंदर्भातील एक महत्वाचे विधेयक पारित करण्यात आले. या कायद्यानुसार आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या आधारे कुलभूषण जाधव यांना फाशीच्या शिक्षेविरोधात पाकिस्तानी उच्च न्यायालयात दाद मागता येणार आहे. दरम्यान, हे कायदे संमत करण्यासाठी आवश्यक सदस्यसंख्या नसल्याचा मुद्दा यावेळी विरोधकांनी उपस्थित केला होता. परंतु सभापती असद कैझर यांनी मतदान घेतल्यानंतर हे कायदे बहुमताने संमत करण्यात आले. यापूर्वी पाकिस्तानच्या संसदेत कुलभूषण जाधव प्रकरणामध्ये यासंदर्भातील अध्यादेश जारी करण्यात आले होते. सविस्तर वाचा...
- कोलकाता - काही दिवसापूर्वी पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाचा धुव्वा उडवत सत्ता काबीज केली. निवडणुकीत भाजपाच्या पराभवानंतर पक्षात मोठा गोंधळ उडालेला आहे. तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केलेल्या मुकुल रॉय यांनी पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोलकात्ता येथे त्यांनी भेट घेतली होती. सविस्तर वाचा...
top 10 @ 11 PM : रात्री अकरापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या! - देशातील महत्त्वाच्या बातम्या
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...
top 10 @ 11 PM : रात्री अकरापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या!

Last Updated : Jun 11, 2021, 11:00 PM IST