- आज दिवसभरात
- भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची पत्रकार परिषद -
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची पत्रकार परिषद पुणे येथे होणार आहे. ही पत्रकार परिषद दुपारी तीन वाजता होणार आहे.
- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज पुणे दौऱ्यावर -
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज पुणे दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने ते विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
- हरयाणा एसएससी पुरुष कॉस्टेबल पदभरती -
हरयाणा स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) पुरुष कॉस्टेबल पदभरतीचे अॅडमिट कार्ड आजपासून उपलब्ध होणार आहे. तर 31 ऑक्टोबर, 1 नोव्हेंबर आणि 2 नोव्हेंबरला यासाठी परीक्षा घेतली जाणार आहे.
- राधे शाम चित्रपटाचा टिझर येणार -
आज राधे शाम या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री पूजा हेगडे प्रमुख भुमिकेत असणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 14 जानेवारी 2022मध्ये प्रदर्शित होणार आहे.
- अभिनेता प्रभास याचा वाढदिवस -
आज अभिनेता प्रभासचा वाढदिवस आहे. त्याचा जन्म 23 ऑक्टोबर 1979मध्ये चेन्नई येथे झाला होता. दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनयाच्या जोरावर त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले. त्याचा बाहुबली हा चित्रपट फार गाजला.
- काल दिवसभरात -
- पुणे - येथील पुणे-मुंबई महामार्गावर नऱ्हे याठिकाणी सेल्फी पॉईंट जवळ थिनर वाहतूक करणाऱ्या टँकरने समोर चाललेल्या टेंपो ट्रॅव्हलरला कट मारण्याच्या नादात धडक दिली. या झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. तसेच १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यावर उपचार सुरू आहेत.
वाचा सविस्तर - थिनर घेऊन जाणाऱ्या टँकरची वाहनाला धडक; चार जणांचा मृत्यू तर 12 जखमी
- मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज 2 ते 3 हजारादरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. आज शुक्रवारी 22 ऑक्टोबरला 1632 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज 40 मृत्यूंची नोंद झाली असून 1744 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.46 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
वाचा सविस्तर - Corona Update - राज्यात 1632 नवे रुग्ण, 40 रुग्णांचा मृत्यू
- मुंबई - अनन्या पांडेची एनसीबीकडून आजची(22 ऑक्टोबर) चौकशी संपली आहे. अनन्या पांडे चौकशीसाठी आज दुसऱ्यांदा एनसीबी कार्यालयात हजर राहिली होती. वडील चंकी पांडेही एनसीबी कार्यालयात अनन्यासोबत हजर होते. तसेच सोमवारी पुन्हा चौकशीला हजर राहण्याचे समन्स एनसीबीने अनन्या पांडेला बजावले आहे.
वाचा सविस्तर - Ananya Panday : अनन्या पांडेची NCB कडून चार तास चौकशी; सोमवारी पुन्हा बोलावले
- मुंबई - दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्जचं प्रकरण बाहेर आलं. बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात ज्या कलाकारांची नावं समोर आली नंतर एनसीबीकडून चौकशीही करण्यात आली होती. त्यानंतर एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अभिनेता एजाज खानला ताब्यात घेतलं होते. आज एजाज खान यांच्या पत्नी आयशा एजास खानची चौकशी करिता एनसीबी कार्यालयात बोलून चौकशी केली.
वाचा सविस्तर - एजाज खानच्या पत्नीची एनसीबीकडून चौकशी
- मुंबई - सीबीआय प्रमुख सुबोध जयस्वाल यांनी फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने पाठवलेल्या प्रश्नावलीला प्रतिसाद दिला आहे. सायबर विभागाने सुबोध जयस्वाल यांना समन्स बजावून १४ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु सुबोध जयस्वाल चौकशीसाठी हजर राहिले नव्हते, यानंतर जयस्वाल यांना सायबर विभागाकडून प्रश्नावली पाठवली गेली होती. त्या प्रश्नानांनी शुक्रवारी जयस्वालांनी उत्तर दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
वाचा सविस्तर - फोन टॅपिंग प्रकरण : सीबीआय प्रमुख सुबोध जयस्वालांकडून मुंबई पोलिसांच्या समन्सला प्रतिसाद
- वाचा आजचे राशीभविष्य -