ETV Bharat / bharat

Todays Top News in Marathi : आजच्या टॉप न्यूज, वाचा एका क्लिकवर

author img

By

Published : Jan 10, 2022, 7:00 AM IST

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे जाणून घ्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

top news
टॉप न्यूज

आज दिवसभरात -

  • PM Modi Security Breach : आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

नवी दिल्ली - पंजाब दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरण आता आणखी तापण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा, न्या. सूर्यकांत आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

  • महाराष्ट्रात आजपासून नवे निर्बंध लागू

मुंबई - वाढत्या ओमायक्रॉन आणि कोरोना संकटाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने राज्यात सोमवार १० जानेवारी २०२२ पासून नवे निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांची यादी राज्य शासनाने प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर केली. पहाटे पाच ते रात्री ११ या वेळेत पाच किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांना एकत्र वावरण्यास बंदी तसेच रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी

  • अनिल देशमुख यांच्या याचिकेवर आज सुनावणी

मुंबई- अटकेत असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तुरुंगामधील मुक्काम आज संपणार आहे. 100 कोटी कथित वसुली प्रकरणात अटक केल्यानंतर देशमुख हे आर्थर रोड तुरुंगामध्ये आहेत. अनिल देशमुख यांनी 4 जानेवारी रोजी जामीनकरिता मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी होणार आहे.

  • अनिल देशमुख यांच्या मालमत्ता जप्तीबाबतच्या याचिकेवर आज सुनावणी

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख कुटुंबीयांनी मालमत्ता जप्ती कारवाई विरोधात मुंबई उच्च न्यायालयात ईडी विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

  • आजपासून स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी

नवी दिल्ली - सरकारकडून स्वस्त दरात गोल्ड खरेदीची संधी आहे. 10 जानेवारी 2022 पासून सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम 2021-2022 च्या अकराव्या सीरिजची विक्री सुरू होणार आहे. ही संधी केवळ पाच दिवसांसाठी 10 जानेवारी ते 14 जानेवारीपर्यंत आहे. गुंतवणुकदारांकडे बाजारातील किंमतीपेक्षा कमी किंमतीत सोनं खरेदीची संधी आहे.

आजचे राशीभविष्य -

काल दिवसभरात -

मुंबई - राज्यात आज सुमारे 44 हजार 388 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे ( Maharashtra Corona Update ). त्यापैकी 15 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर, 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सर्वाधिक 19 हजार 474 रुग्ण सापडले. शनिवारी 20 हजार रुग्ण आढळून आले होते. तर, राज्यात 2 लाख रुग्ण सक्रिय आहेत. दुसरीकडे आज ओमायक्रॉनच्या रुग्णांनी 200 चा टप्पा पार केला आहे, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.

पणजी : गोवा विधानसभेच्या निवडणुकीची ( Goa Assembly Election 2022 ) तारीख घोषित होताच सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार घोषित करण्यास सुरुवात केली ( Candidate List For Goa Assembly Election ) आहे. काँग्रेसने आपली दुसरी उमेदवार यादी जाहीर केली ( Goa Congress Candidate Second List ) असून, यात सात उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. यापूर्वी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत 10 उमेदवारांना स्थान देण्यात आले होते. रविवारी रात्री उशिरा घोषित करण्यात आलेल्या यादीत 7 जणांचा समावेश आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा (UP Election Schedule 2022) निवडणूक आयोगाने केली आहे. त्यामळे आता सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यातील उत्तर प्रदेशची निवडणूक (UP Election 2022) भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे. या निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनाही (Shivsena) उतरली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) ज्या ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील त्या मतदारसंघात शिवसेना विरोधी पक्षांना मदत करणार असून, त्यासाठी शिवसैनिक जोमात काम करणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष ठाकूर अनिल सिंह (Thakur Anil Singh) यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

पुणे - राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाच्या (Corona Hike) पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने नवीन निर्बंध (Strict Restrictions) लावण्यात आहे आहेत. रविवारी मध्यरात्रीपासून राज्यात नाईट कफ्यू (Night Curfew in Pune) लावण्यात आला आहे. पुण्यातही चौकाचौकात पुणे पोलिसांच्यावतीने नाकाबंदी करण्यात आली आहे. कोरोना नियमांचे पालन करा असे आवाहन सुरुवातीला पोलिसांकडून नागरिकांना करण्यात येत आहे. हे आवाहन नागरिकांनी पाळले नाही तर रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी समर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांनी दिला आहे.

पणजी(गोवा) - 2017 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेल्या सांगेचे आमदार प्रसाद गावकर (Prasad Gaonkar join Congress) यांनी रविवारी आपल्या आमदारकीचा राजीनाना विधानसभा सचिवांकडे जमा केला. दुपारी राजीनामा देताच संध्याकाळी त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सध्या गोवा विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election 2022) रणधुमाळी सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.