ETV Bharat / bharat

येत्या वर्षभरात सर्व टोलनाके हटवणार; नितीन गडकरी यांची लोकसभेत घोषणा - नितीन गडकरी लेटेस्ट न्यूज

महामार्गावरील लोकांना अडचणींचा सामना करावा लागू नये. म्हणून येत्या एक वर्षाच्या आत टोलनाके हटवण्यात येतील, असे परिवहन व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

नितीन गडकरी
नितीन गडकरी
author img

By

Published : Mar 18, 2021, 4:38 PM IST

नवी दिल्ली - परिवहन व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत मोठी घोषणा केली आहे. महामार्गावरील लोकांना अडचणींचा सामना करावा लागू नये. म्हणून येत्या एक वर्षाच्या आत टोलनाके हटवण्यात येतील. यूपीच्या अमरोहा लोकसभा मतदारसंघाचे खासदार कुंवर दानिश अली यांनी गढ मुक्तेश्वरजवळ शहराच्या हद्दीतील टोलनाक्याचा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हा उत्तर देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

येत्या एका वर्षात सर्व टोलनाके हटवण्यात येतील. यावर सरकार काम करत आहे. टोल बूथवर प्रचंड गर्दी आणि प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेता शासना ने फास्टॅगची सोय केली. जेणेकरून प्रवाशांना आपला टोल भरता येईल आणि सहजपणे टोलनाका सोडता येईल. ही एक ऑनलाईन टोलनाका देय सुविधा आहे, जी तुम्हाला रोखीऐवजी डिजिटल करणे आवश्यक आहे, असे गडकरी म्हणाले.

जेव्हढा रस्ता वापराल, तेव्हढाच टोल द्यावा लागेल -

रस्ते प्रकल्प कराराचा लाभ घेण्यासाठी मागील सरकारमध्ये असे टोल ब्लॉक बनविण्यात आले होते. हे चुकीचे आणि अन्यायकारक आहे. जर आता कारवाई केली तर रस्ता बनविणारी कंपनी भरपाईची मागणी करेल, असेही त्यांनी सांगितले. येणाऱ्या काळात सर्व टोलनाके दूर होतील. महामार्गावर प्रवेश केल्यानंतर जीपीएस ट्रॅकरच्या मदतीने कॅमेरा फोटो काढले. लोकांना जेवढ्या अंतराचा प्रवास केला. तेवढेच पैसे द्यावे लागतील. अशा तंत्रज्ञानावरही सरकार काम करत आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

देश टोलमुक्त -

राज्यात सर्वत्र टोलनाक्यांचे जाळे विणण्यात आले आहे. प्रत्येक महामार्गावर टोलनाके आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि एनएचआय यांच्याकडून विविध रस्त्यावर टोलवसुली होते. या तिन्ही यंत्रणासाठी एकुण 40 कंत्राटदार टोलवसुली करतात. दरम्यान अनेक ठिकाणी टोलवसुलीचे कंत्राट पूर्ण झाल्यानंतरही टोलवसुली केली जात असल्याचा आरोप टोल अभ्यासकांकडून केला जात आहे. यासाठी त्यांनी न्यायालयात ही धाव घेतली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोलचा वाद तर पेटलेलाच आहे. अनेक टोल बंद करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे रशियन तंत्रज्ञान आणत देशातील सर्व टोलनाकेच बंद करण्यात येणार आहेत. वाहनचालकाच्या खात्यातून टोलची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. पण या तंत्रज्ञानाची अधिकची माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा - रिप्ड जीन्स विधानावर महिला नेत्यांचा तीरथसिंह रावत यांच्यावर हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.