आज 'या' बातम्यांवर असेल नजर -
- औरंगाबाद - आजपासून (दि. 25 सप्टेंबर) यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मराठवाडा साहित्य संमेलनाची सुरुवात होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास होणार आहे.
- जळगाव - राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षण हक्क परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत ओबीसी आरक्षण संदर्भात ठराव होण्याची शक्यता आहे.
- औरंगाबाद - कुंभेफळ या ठिकाणी बांधण्यात आलेल्या महिला व बालकांच्या रुग्णालयाच्या इमारतीचे लोकार्पण मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. यासह विविध विकास कामांचे उद्घाटन मंत्री चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
- मुंबई, तळकोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
कालच्या महत्त्वाच्या बातम्या -
- वॉशिंग्टन - अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली आहे. जो बायडेन यांनी चर्चेदरम्यान महात्मा गांधी यांच्या जयंतीचा उल्लेख केला. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की गांधींजी हे विश्वासर्हतेबाबत बोलले होते. ही संकल्पना सध्याच्या काळात आपल्या पृथ्वीसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे आहे. सविस्तर वाचा ..
- मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवलेली धार्मिकस्थळे येत्या नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे 7 ऑक्टोबरपासून खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज(24 सप्टेंबर) जाहीर केला. दरम्यान, आरोग्याच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. सविस्तर वाचा ...
- नवी दिल्ली- देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत 761 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. शुभम कुमार यांनी देशात पहिला क्रमांक पटकाविला आहे. हा निकाल लोकसेवा आयोगाने जाहीर केला आहे. सविस्तर वाचा ...
- मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत आहेत. गुरुवारी 3 हजार 608 रुग्ण आढळून आले होते. शुक्रवारी त्यात किंचित घट होऊन 3 हजार 286 रुग्ण आढळून आले आहेत. 51 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 3 हजार 933 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सविस्तर वाचा ...
जाणून घ्या आजचे राशीभविष्य -
- 25 सप्टेंबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
- VIDEO : 25 सप्टेंबर राशीभविष्य - कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य
आजची प्रेरणा : दिवसाची सुरुवात करा गीतेतील प्रेरक विचारांनी
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा