ETV Bharat / bharat

वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर - Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Sep 24, 2021, 6:28 AM IST

आज 'या' बातम्यांवर असेल नजर -

  • पुणे - सकाळी 11 वाजता नितीन गडकरी यांच्या हस्ते कात्रज उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार आहे.
  • पुणे - आज उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची पुण्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांसह कोरोना संदर्भात बैठक आहे. यावेळी कोरोनाग्रस्तांची सध्याची स्थिती, उपाययोजना याबाबत चर्चा होणार आहे.
  • जळगाव - ओबीसी आरक्षण हक्क परिषदेसाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्या आहेत. सायंकाळी त्यांच्या उपस्थितीत जळगावात महात्मा फुले नगर नामांतर सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला पालमंत्री गुलाबरा पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत.
  • पुणे - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे सेनापती बापट रोड येथील सिम्बायोसिस विद्यापीठाच्या विश्वभवन हॉलमध्ये उपस्थित राहतील.
  • आज आयपीएल 2021 मधील 35 सामना आहे. हा सामना रॉयल चॅलेन्ज बेंगलोर व चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. हा सामना भारतीय वेळनुसार सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सुरू होईल.

कालच्या महत्त्वाच्या बातम्या -

  • जालना - परतूर तालुक्यातील श्रीष्टी येथे जालना - आष्टी बस कसुरी नदीवरील पुलावरून कलंडल्याची घटना घडली आहे. या बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. बसमध्ये 25 प्रवाशी होते, त्यात 2 लहान मुलांचा देखील समावेश आहे. सविस्तर वाचा ...
  • नवी दिल्ली - कोरोनाने आत्महत्या केलेल्या नागरिकांच्या कुटुंबांनाही केंद्र सरकारकडून 50 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. ही माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबांना 50 हजारांची मदत करणार असल्याचे बुधवारी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते. सविस्तर वाचा ...
  • मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. रोज तीन ते चार हजारांच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी २५८३, मंगळवारी ३१३१, बुधवारी ३६०८ रुग्ण आढळून आले. आज गुरुवारी २३ सप्टेंबरला त्यात किंचित घट होऊन ३३२० रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात ६१ मृत्यूंची नोंद झाली असून ४०५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली. सविस्तर वाचा ...
  • कोल्हापूर - रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर बोरपाडले घाटात भरधाव कारला अचानक आग लागली. या आगीत कार जळून खाक झाली असून यामध्ये दुर्दैवाने वाहन चालकाचा होरपळून मृत्यू झाला. अभिजित पांडूरंग ठाणेकर (रा. आजरा) असे या चालकाचे नाव आहे. सविस्तर वाचा ...
  • ठाणे - डोंबिवलीतील बलात्काराची घटना अतिशय निंदनीय असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना आरोपीवर कोठार कारवाईचे आदेश दिले आहेत. सविस्तर वाचा ...

जाणून घ्या आजचे राशीभविष्य -

अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.