ETV Bharat / bharat

'महाकुंभ' आमचे सर्वोच्च प्राधान्य; उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांची माहिती - महाकुंभ मेळा तीरथ सिंह

रावत म्हणाले, की महाकुंभ मेळ्याचे भव्य आयोजन करण्याला आम्ही सध्या प्राधान्य देत आहोत. यासाठी प्रशासनाना आवश्यक ते निर्देश देण्यात आले आहेत. या पवित्र स्थळी येण्यापासून कोणालाही मज्जाव करु नये असेही निर्देश आपण दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Tirath Singh Rawat's big announcement regarding Haridwar Kumbh
महाकुंभमेळा आमचे सर्वोच्च प्राधान्य; उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांची माहिती
author img

By

Published : Mar 11, 2021, 8:24 PM IST

देहराडून : तीरथ सिंह रावत यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून बुधवारी शपथ घेतली. यानंतर त्यांनी आज (गुरुवारी) महाशिवरात्रीच्या निमित्ताने महाकुंभ मेळ्याच्या परिसराला भेट दिली. यावेळी ईटीव्ही भारतशी बोलताना ते म्हणाले, की महाकुंभ मेळ्यालाच आमचे सध्या सर्वोच्च प्राधान्य असणार आहे.

रावत म्हणाले, की महाकुंभ मेळ्याचे भव्य आयोजन करण्याला आम्ही सध्या प्राधान्य देत आहोत. यासाठी प्रशासनाना आवश्यक ते निर्देश देण्यात आले आहेत. या पवित्र स्थळी येण्यापासून कोणालाही मज्जाव करु नये असेही निर्देश आपण दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाकुंभमेळा आमचे सर्वोच्च प्राधान्य; उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांची माहिती

स्वतःला नशीबवान समजतो..

भाविकांना कोणत्याही गोंधळाशिवाय हरिद्वारमध्ये येण्यास परवानगी देण्यात यावी, असे तीरथ यांनी स्पष्ट केले. तसेच, त्यांनी सर्व भाविकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहनही यावेळी केले. रावत यांनी हर की पौडी येथे संतांकडून आशिर्वाद घेतले. आपण स्वतःला अगदीच नशिबवान समजत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

हेही वाचा : नरेंद्र मोदींच्या आईने घेतली कोरोना लस; पंतप्रधानांनी ट्विट करत दिली माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.