रंगारेड्डी (तेलंगणा) - कार पार्क केलेल्या लॉरीला धडकल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील शमशाबाद मंडळाच्या पेड्डा गोलकोंडा येथे ही घटना घडली. संदीप, आनंद आणि रंगनाथ अशी मृतांची ओळख नावं असून त्यांची ओळख पटली आहे. ते महाराष्ट्रातील रहिवासी आहेत. या घटनेत जखमी झालेल्या अन्य दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
शमशाबादचे डीसीपी जगदीश्वर रेड्डी यांनी घटनास्थळाची पाहणी केली - जखमींना शमशाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उस्मानिया रुग्णालयात हलवण्यात आला. हा अपघात झाला तेव्हा हे सर्वजण हयातनगरहून शमशाबादच्या दिशेने जात होते. शमशाबादचे डीसीपी जगदीश्वर रेड्डी यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून आवश्यक ती पोलीस विभागात नोंद केली आहे.
-या बातमीबद्दल आणखी काही सविस्तर माहिती येत आहे. त्यानंतर अपडेट केली जाईल