ETV Bharat / bharat

मुलाकडून ऑनलाईन गेम खेळताना एक चूक; शिक्षिकिने गमाविले तीन लाख रुपये

सायबर तज्ज्ञ विराज मंडल म्हणाले, की मुले मोफत फ्री फायर गेम खेळण्याच्या नादात फसत आहेत. एकदा युपीआयडी गेमच्या व्यवहारात टाकला तर तो तसाच जतन होतो. गेम अपग्रेड केल्यानंतर हे पैसे खात्यामधून वजा होतात.

author img

By

Published : Jun 29, 2021, 8:21 PM IST

online game
ऑनलाईन गेम

रांची - कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्याने मुलांमध्ये ऑनलाईन गेम खेळण्याचे प्रमाण वाढत आहे. मुले ऑनलाईन शिक्षण घेत असताना त्यांच्या ऑनलाईन गेमवर खेळण्यावर नियंत्रण करणे पालकांना कठीण जात आहे. मात्र, पखांजूरमधील शिक्षिकेला मुलाच्या ऑनलाईन गेम खेळण्यामुळे ३ लाख २२ हजारांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

पखांजूरमधील शिक्षिका शुभ्रा पाल यांनी ऑनलाईन फसवणूक झाल्याची पोलिसात तक्रार केली. मार्च ते जूनपर्यंत २७८ आर्थिक व्यवहार झाल्याने ३ लाख २२ हजार रुपये खात्यातून काढल्याचे शिक्षिकेने तक्रारीत म्हटले. पोलिसांनी तपास केला असताना त्यांना धक्कादायक माहिती समोर आली. शिक्षिकेचा १२ वर्षाचा मुलगा ऑनलाईन गेम खेळत होता. त्याने गेम अपग्रेड करण्यासाठी २७८ वेळा पैशांचे ऑनलाईन व्यवहार केले होते. पोलिसांनी चौकशी केली असताना मुलाने गेममध्ये हत्यार खरेदी करण्यासाठी पैसे खर्च केल्याचे सांगितले.

मुले मोफत फ्री फायर गेम खेळण्याच्या नादात फसतात

हेही वाचा-मॉर्डना लस भारतात लवकरच होणार दाखल; केंद्राने सिप्लाला आयातीची दिली परवानगी

अनेकजणांना ऑनलाईन गेम खेळण्याचे व्यसन

ऑनलाईन व्हिडिओ गेम खेळल्याने मुलांना मानसिक रोगांना सामोरे जावे लागेल, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करतात. पोलीस ठाण्याचे प्रभारी शरद दुबे म्हणाले, की पहिल्यांदाच असे प्रकरण समोर आले आहे. परिसरातील अनेकजणांना ऑनलाईन गेम खेळण्याचे व्यसन आहे. गेम अपग्रेड करण्यासाठी मुले पॉकेट मनी खर्च करत आहे. गेम अपग्रेड करण्याकरिता मित्रांकडून पैसे घेतात.

हेही वाचा-सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या, आजचे दर

फसवणूक टाळण्याकरिता ही घ्या काळजी-

सायबर तज्ज्ञ विराज मंडल म्हणाले, की मुले मोफत फ्री फायर गेम खेळण्याच्या नादात फसत आहेत. एकदा युपीआयडी गेमच्या व्यवहारात टाकला तर तो तसाच जतन होतो. गेम अपग्रेड केल्यानंतर हे पैसे खात्यामधून वजा होतात. त्यासाठी कोणतेही नोटिफिकेशन येत नाही. गेममधून व्यवहार केले तर बँकेचे खाते व युपीआयची नोंद जतन करू नये, असा सल्ला मंडल यांनी दिला आहे.

हेही वाचा-स्टेट बँकेतून पैसे काढण्याकरिता बदलले नियम; जाणून घ्या अन्यथा होईल नुकसान

पब्जीवर बंदी लागू झाल्यानंतर फ्री फायरकडे मुलांचा ओढा

केंद्र सरकारने गतवर्षी वापरकर्त्यांचा डाटा सुरक्षित राहत नसल्याने पब्जीवर बंदी लागू केली. त्यानंतर मुले बॅटल रॉयल गेम, फ्री फायर गेम अशा गेमकडे वळाले आहेत.

अधिकतर खेळण्यात येणारे ऑनलाईन आणि डिजीटल व्हिडिओ गेम

  • ब्ल्यू व्हेल (blue whale)
  • पब्जी (pubg)
  • मोमो गेम (momo game)
  • फ्री फायर (free fire)
  • मँडक्राफ्ट (mandcraft)
  • कॉल ऑफ ड्यूटी (call of duty)
  • बॅटललँड रॉयल (battleland royale)

दरम्यान, पालकांनी मुलांनी योग्य वेळ दिल्यानंतर मुलांमधील ऑनलाईन गेमिंगचे प्रमाण कमी होऊ शकते, असे तज्ज्ञ सल्ला देतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.