ETV Bharat / bharat

Ram Janmabhoomi Ayodhya: अयोध्येतील राम जन्मभूमीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलीस अलर्टवर

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी परिसराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने मोबाईलवर फोन करून आज सकाळी ही धमकी दिली. पोलिसांना अलर्टवर ठेवण्यात आले असून, तपास सुरु आहे.

Threat to blow up Ram Janmabhoomi in Ayodhya
अयोध्येतील राम जन्मभूमीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलीस अलर्टवर
author img

By

Published : Feb 2, 2023, 5:10 PM IST

अयोध्या (उत्तरप्रदेश): रामजन्मभूमी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. रामजन्मभूमी येथील यलो झोन परिसरात असलेल्या रामलला सदनमध्ये राहणाऱ्या मनोज कुमार यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिली. पहाटे साडेपाच वाजता अज्ञात व्यक्तीने मोबाईलवर फोन करून रामजन्मभूमी उडवून देण्याची धमकी दिली. तक्रारदार मनोज यांनी माहिती दिल्यानंतर रामजन्मभूमी पोलीस स्टेशन प्रभारी यांनी एफआयआर नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत.

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येतील यलो झोन भागात असलेल्या रामलला सदनमध्ये राहणाऱ्या मनोज कुमार यांच्या मोबाईल क्रमांकावर सकाळी साडेपाच वाजता अज्ञाताने कॉल केला. ते म्हणाले की, मी दिल्लीहून बोलत असून आज दहा वाजता रामजन्मभूमी बॉम्बने उडवून दिली जाईल. मनोज कुमार सध्या प्रयागराजमध्ये राहत आहेत. मनोजने तत्काळ रामजन्मभूमी पोलिस स्टेशनला फोनवरून याची माहिती दिली. पोलिसांनी त्याने दिलेल्या मोबाईल क्रमांकाचा तपास सुरू केला आहे. पोलीस स्टेशन अध्यक्ष संजीव कुमार सिंह यांच्या वतीने रामजन्मभूमी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

नेपाळमधून आणले शाळीग्राम खडक: अयोध्येत भगवान रामाच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी भारताच्या शेजारील देश नेपाळ जनकपूर येथून आलेल्या शालिग्राम खडकांसाठी अयोध्येच्या रामसेवकपुरम संकुलात ५१ आचार्य आणि अयोध्येतील अनेक संतांच्या उपस्थितीत वैदिक जप करण्यात आला. यानंतर ते श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. या पूजा कार्यक्रमात नेपाळचे माजी पंतप्रधान आणि जनकपूर मंदिराचे महंत राम तपेश्वर दास यांच्यासह अनेक संत आणि पाहुणे उपस्थित होते. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

शिळांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी: हे शालिग्राम खडक नेपाळमधील जनकपूर येथून 26 जानेवारी रोजी बुधवारी सायंकाळी निघाले आणि सुमारे 6 दिवसांचा प्रदीर्घ प्रवास पूर्ण करून अयोध्येला पोहोचले. जिथे रात्री उशिरा अयोध्या नगरीच्या हद्दीत या खडकांचे भव्य स्वागत करण्यात आले. आरती करून शीला घेऊन येणाऱ्या रामभक्तांना ऋषी-मुनींनी नमस्कार केला. यानंतर या खडकांचे दर्शन घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत रामसेवक पुरममध्ये लोकांची गर्दी झाली होती.

हेही वाचा: Ayodhya News : 51 महंतांकडून शालिग्राम शिलांची पूजा, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे शीला सुपूर्द

बातमी अपडेट होत आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.