हैदराबाद - ‘विश्वसुंदरी 2021' (Harnaaz Sandhu wins Miss Universe 2021) किताब मिळवून हरनाझ संधूने आपल्या भारतीयांची मान पुन्हा एकदा ताठ केली. तब्बल 21 वर्षांनी हा जल्लोष साजरा करण्याचं भाग्य भारतीयांच्या पदरी पडलं. ‘मिस युनिव्हर्स 2021’ ( Miss Universe 2021 winner Harnaaz Sandhu ) च्या अंतिम फेरीत पोहोचेपर्यंत अनेक कठीण मार्ग पार पाडावे लागतात. सौंदर्य स्पर्धेत विजेता होण्यासाठी केवळ सुंदर दिसणं पुरेसं नाही. तर त्या व्यक्तीची समज, ज्ञान आणि हजरजबाबीपणा सुद्धा महत्त्वाचा असतो.
‘मिस युनिव्हर्स 2021’ (Miss Universe 2021) किताब अशा सुंदरीच्या डोक्यावर चढवला जातो, जी शेवटच्या प्रश्नाचं आकर्षक आणि समर्पक उत्तर देते. अख्ख्या जगासमोर आत्मविश्वासाने प्रश्नाचं योग्य उत्तर देत हरनाझ संधूने (Miss Universe 2021 winner Harnaaz Sandhu ) मुकुट आपल्याकडे खेचून घेतला आहे.
-
The new Miss Universe is...India!!!! #MISSUNIVERSE pic.twitter.com/DTiOKzTHl4
— Miss Universe (@MissUniverse) December 13, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The new Miss Universe is...India!!!! #MISSUNIVERSE pic.twitter.com/DTiOKzTHl4
— Miss Universe (@MissUniverse) December 13, 2021The new Miss Universe is...India!!!! #MISSUNIVERSE pic.twitter.com/DTiOKzTHl4
— Miss Universe (@MissUniverse) December 13, 2021
विश्वसुंदरीच्या अंतिम फेरीत आलेल्या तीन सौदर्यंवतींना एक प्रश्न विचारण्यात आला. आजच्या काळात दडपणाचा सामना करणार्या तरुणाईला काय सल्ला द्याल?, यावर हरनाझने मनाला भिडणारं उत्तर दिलं.
यावर हरनाझ म्हणाली, की 'आजच्या तरुणाईवरील सर्वात मोठे दडपण म्हणजे त्यांचा स्वत:वरचा विश्वास. तुम्ही सर्वांपेक्षा वेगळे आहात, हीच गोष्ट तुम्हाला खास बनवते. स्वत:ची इतरांसोबत तुलना करणं थांबवा. जगभरात जे काही चालले आहे, त्याबद्दल बोलणं खूप महत्त्वाचे आहे. बाहेर पडा, स्वतःसाठी बोला. कारण, तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. तुम्हीच तुमचा आवाज आहात. माझा माझ्यावर विश्वास आहे, म्हणूनच मी आज इथे उभी आहे. या उत्तराने परीक्षकांसह उपस्थितांची मने जिंकली. या प्रश्नाच्या उत्तरांमुळे हरनाझ पहिल्या तीनमध्ये अव्वल ठरली आणि तिला विजेता घोषित करण्यात आले.
-
FINAL STATEMENT: India. #MISSUNIVERSE
— Miss Universe (@MissUniverse) December 13, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The 70th MISS UNIVERSE Competition is airing LIVE around the world from Eilat, Israel on @foxtv pic.twitter.com/wwyMhsAyvd
">FINAL STATEMENT: India. #MISSUNIVERSE
— Miss Universe (@MissUniverse) December 13, 2021
The 70th MISS UNIVERSE Competition is airing LIVE around the world from Eilat, Israel on @foxtv pic.twitter.com/wwyMhsAyvdFINAL STATEMENT: India. #MISSUNIVERSE
— Miss Universe (@MissUniverse) December 13, 2021
The 70th MISS UNIVERSE Competition is airing LIVE around the world from Eilat, Israel on @foxtv pic.twitter.com/wwyMhsAyvd
टॉप-5 फेरीत विचारला होता हा प्रश्न -
तर याआधी टॉप-5 फेरीत स्पर्धकांना हवामान बदलाशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता. अनेक लोकांना वाटते की क्लायमेट चेंज ही मोठी समस्या आहे, तुला याबद्दल काय वाटतं? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर हरनाझ म्हणाली, 'हवामान बदल ही गंभीर समस्या आहे. आताची परिस्थितीप पाहून मला याविषयी काळजी वाटते. त्यावर आपण सर्वांनी काम करणे गरजेचे आहे. हे सर्व आपल्या निष्काळजीपणामुळे होत आहे. बोलण्यापेक्षा कृती करण्याची ही वेळ आहे, असे मला वाटते. आपली प्रत्येक कृती ही पर्यावरणाला वाचवू शकते. त्यामुळे पश्चात्ताप आणि चुका सुधारण्यापेक्षा आधीच आधीच काळजी घेतलेली कधीही उत्तम असते, असे उत्तर देत हरनाझ टॉप 3 म्हणजेच अंतिम फेरीत पोहचली.
-
Final questions are here! The first to go is India. #MISSUNIVERSE
— Miss Universe (@MissUniverse) December 13, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The 70th MISS UNIVERSE Competition is airing LIVE around the world from Eilat, Israel on @foxtv pic.twitter.com/xpPLfORQXA
">Final questions are here! The first to go is India. #MISSUNIVERSE
— Miss Universe (@MissUniverse) December 13, 2021
The 70th MISS UNIVERSE Competition is airing LIVE around the world from Eilat, Israel on @foxtv pic.twitter.com/xpPLfORQXAFinal questions are here! The first to go is India. #MISSUNIVERSE
— Miss Universe (@MissUniverse) December 13, 2021
The 70th MISS UNIVERSE Competition is airing LIVE around the world from Eilat, Israel on @foxtv pic.twitter.com/xpPLfORQXA
यापूर्वी सर्वप्रथम 1994 मध्ये सुष्मिता सेनने भारताला हा बहुमान मिळवून दिला. त्यानंतर लारा दत्ताने 2000 साली हा किताब जिंकला होता. आता तब्बल 21 वर्षांनी हरनाझ संधूने मिस युनिव्हर्सचा ताज पटकावला आहे. इस्रायलच्या इलियट येथील एका रिसॉर्टमध्ये आयोजित स्पर्धेत मॅक्सिकोची माजी मिस यूनिव्हर्स एंड्रिया मेजाने हरनाझ संधुच्या डोक्यावर ताज चढवला. 21 वर्षीय हरनाज मूळ पंजाबची रहिवाशी आहे.
‘मिस युनिव्हर्स’ सुष्मिता सेनने दिलं होतं हे उत्तर -
भारतासाठी पहिल्यांदा सुष्मिता सेनने ( Miss Universe 1994 Sushmita Sen ) वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी ‘मिस युनिव्हर्स’ किताब जिंकला होता. जर तुम्ही कोणतीही ऐतिहासिक घटना बदलू शकत असाल, तर ती काय असेल?, असा प्रश्न ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेदरम्यान सुष्मिताला विचारण्यात आला होता. त्यावर सुष्मिताने ‘इंदिरा गांधींचे निधन’ असे म्हटलं होतं. सुष्मिताच्या या उत्तरामुळे तिला ‘मिस युनिव्हर्स’चा किताब मिळवून दिला होता.
भारताची दुसरी ‘मिस युनिव्हर्स’ लारा दत्ताचे उत्तर -
सुष्मिता सेननंतर ‘मिस युनिव्हर्स’ बनणारी लारा दत्ता ( Lara Dutta Miss Universe 2000 ) दुसरी भारतीय महिला ठरली होती. लाराने 2000 साली ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला होता. तेव्हा लारा 22 वर्षांची होती.
'मिस युनिव्हर्स' या सौंदर्यस्पर्धेच्या वेळी सायप्रस याठिकाणी निदर्शनं करण्यात आली होती. या सौंदर्यस्पर्धेने महिलांचा अनादर केला, असं त्या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं. याला अनुसरूण अंतिम फेरीत प्रश्न विचारण्यात आला होता.
'सौंदर्य स्पर्धा ही महिलांसाठी आदरणीय नाही? हे वक्तव्य चुकीचे आहे, हे कसे पटवून द्याल?', असा प्रश्न लाराला विचारण्यात आला होता. तेव्हा लाराने उत्तर दिले की, ‘मिस युनिव्हर्स’सारख्या स्पर्धा तरुणींसाठी एक उत्तम व्यासपीठ आहेत. अशा स्पर्धा तरुणींना पाहिजे त्या क्षेत्रात प्रगती करण्यास आणि पुढे जाण्यास उद्युक्त करतात. सैन्यदल , राजकारण किंवा व्यवसाय, ही स्पर्धा तरुणींना आपली मतं मांडण्यासाठी आणि आम्ही स्वावलंबी आहोत हे दाखवून देण्यासाठी याचबरोबर सक्षम बनवण्यासाठी एक व्यासपीठ मिळवून देते', असे उत्तर देत लाराने ‘मिस युनिव्हर्स’चा किताब पटकावला होता.