ETV Bharat / bharat

JEE IIT result : जेईई आयआयटी निकालामध्ये यंदा मुलींची टक्केवारी-कामगिरी चमकदार

author img

By

Published : Jun 18, 2023, 3:48 PM IST

जेईई आयआयटी निकालामध्ये यंदा मुलींची टक्केवारी-कामगिरी चमकदार झाल्याचे दिसत आहे. आयआयटी मुंबईमधून आदिती सिंग, दिल्लीमधून वनी गुप्ता, गुहाटीमधून अक्षरा, हैदराबादमधून नयनाकांती तर कानपूरमधून पलक अग्रवाल, खरगपूरमधून अनन्या आणि आयआयटी रूरकी मधून इशिता या विद्यार्थिनींनी उच्चश्रेणी मिळवली आहे.

JEE IIT
JEE IIT

मुंबई - यावर्षीचा जॉइंट एंट्रन्स एक्झाम 2023 आयआयटी निकाल लागलेला आहे. या निकालामध्ये मुलांपेक्षा मुलींनी अधिक भरीव कामगिरी केल्याचे स्पष्ट होत आहे. जाणून घेऊया सविस्तरपणे, यंदाची आयआयटी प्रवेशासाठीची परीक्षा झाली आणि त्याचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये देशातील विविध आयआयटी मधील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. तर आयआयटी हैदराबाद झोनमधून चिदविलास रेड्डी याने 360 पैकी 341 असे भारतात विक्रमी गुण मिळवलेले आहेत. तर याच विभागातील नयनकांती नागा ही महिलांमध्ये उच्च गुण मिळवून प्रथम आली. तिची भारतातील श्रेणी 56 आहे आणि तिला 360 पैकी 298 गुण मिळाले आहेत.

एकूण मुले आणि मुली यामध्ये जे परीक्षेला बसले होते. त्याच्यामध्ये 2023 यावर्षी पुरुषांची नोंदणी 14 लाख 61 हजार 111 त्यामध्ये प्रत्यक्ष पात्र झालेल्यांची संख्या 39 हजार 727 आणि प्रत्यक्ष परीक्षेला बसले 36 हजार 264. तर एकूण महिला विद्यार्थिनींची नोंदणी 43,633 तर प्रत्यक्ष परीक्षेला बसल्या 40,645 आणि प्रत्यक्ष परीक्षेसाठी पात्र ठरल्या 7,509 महिला विद्यार्थिनी.

देशभर लागलेला ह्या जॉईंट एंट्रन्स एक्झाम प्रगत 2023 यामधील कट ऑफ गुणांची जी टक्केवारी आहे ती अशी. अनुसूचित जमातींसाठी 3.42% ते 11.95% तर अनुसूचित जातींसाठी 3.42 ते 11.95 तर खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकासाठी 6.15% ते 21.50% तर ओबीसी मधील नॉन क्रिमिलियर रँक लिस्ट मध्ये 6.15% ते 21.50% आणि केंद्रीय सरळ मिळून कट ऑफ लिस्ट तर विषय नुसार 6.83% तर सर्वसाधारण कट ऑफ 23.89% अशी आहे.

प्रत्येक आयआयटी विभागनिहाय किती विद्यार्थी होते त्याची सर्वसाधारण माहिती मुंबई मधून 797 एकूण विद्यार्थी परीक्षेला बसले तर दिल्ली येथून 9290 गुहाटी मधून 2395 हैदराबाद मधून दहा हजार 432 कानपूर येथून ४५८२ खडकपूर मधून 4618 आणि रुकी मधून 4499.

एकूण देश पातळीवर सर्व विभाग मिळून 18 लाख 9 हजार 744 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी प्रत्यक्ष दोन्ही पेपर साठी जे अपीयर झाले ते अठरा लाख 372 आणि पात्र झाले चार लाख 3773 इतके.

झोन निहाय टॉपर - सेंट्रल रँकिंग लिस्ट विभागणीय याप्रमाणे आहे आय आय टी मुंबई येथे उज्वल एल शंकर 11 श्रेणीत, युवराज गुप्ता 13 तर चैतन्य माहेश्वरी 15व्या आणि जत्स्या जरिवाला 24 व्या श्रेणीत तर सुमेध 37 श्रेणीमध्ये आहे. त्यानंतर दिल्ली दिल्ली विभागामध्ये प्रभव खंडेलवाल 6 मलया केडिया 8 हर्षित कन्सल 16 व्या श्रेणीत तर समीर अरविंद पाटील 20 व्या आणि देशांक प्रताप सिंग 22 व्या श्रेणीमध्ये आले. तर आयआयटी गुहाटी विभागात विश्वन सव्यासाची 80 गुण, यशस्वी राज 145 रसिक दास 355, अनुभव सहा 398 तर वैभव सिंग 575 असे गुण त्याने प्राप्त केले.

विद्यार्थ्यांनी थेट डायरेक्ट लिंकवर क्लिक करून आपले प्रोफाईल आपला नोंदणी क्रमांक मोबाईल क्रमांक भरल्यास आपला निकाल पाहता येईल खालील लिंक वर क्लिक करा Direct link to check result: https://result23.jeeadv.ac.in/ , Final answer key of Paper 1: https://jeeadv.ac.in/documents/Paper1_Final_Answer_Keys.pdf , Final answer key of Paper 2: https://jeeadv.ac.in/documents/Paper2_Final_Answer_Keys.pdf

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.