पणजी- ओमायक्रॉनमुळे चिंताजनक स्थिती निर्माण झाली असताना विदेशी पर्यटकांचा गोव्यात ओघ सुरू होत आहे. कोविड काळात तब्बल दोन वर्षानंतर आज पहिले चार्टर्ड फ्लाईट गोव्यात उतरले. कझाकिस्तानमधून एअर विस्टाच्या विमानातून आज 159 परदेशी पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत.
मागील दोन वर्षांपासून बंद असलेले आंतरराष्ट्रीय पर्यटन पुन्हा एकदा आजपासून सुरू झाले. कझाकिस्तानमधून एअर विमानातून 159 परदेशी पर्यटक आज गोव्यात दाखल झाले. गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोव्याचे वाहतूक मंत्री म्हाव्हीन गुडीन्हो, विमानतळ अधिकारी आणि गोवा पर्यटन महामंडळाच्यावतीने या पर्यटकांचे स्वागत ( Goa tourism department welcomes tourists ) करण्यात आले आहे.
हेही वाचा-Karan Johar Party Update : करणसह, अमृता अरोरा आणि करीना कपूरच्या इमारतींना केले सील
दोन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय पर्यटन सुरू
मागील दोन वर्षांपासून कोविडमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन बंद होते. कोविडच्या पहिल्या लाटेनंतर देशांतर्गत वाहतूक सुरू झाली. मात्र, आंतरराष्ट्रीय पर्यटन सुरू करण्यासाठी सरकारने मागील दोन महिन्यांपासून तयारी सुरू केली होती. त्याविषयी केंद्रीय गृहमंत्रालय व पंतप्रधान कार्यालयाकडे गोवा सरकारने परवानगी मागितली होती. केंद्राने रीतसर परवानगी दिल्यानंतर आज अखेर पहिले चार्टर्ड फ्लाईट गोव्यात दाखल झाले.
हेही वाचा-Aslam Shaikh On Omicron : लहान मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा- अस्लम शेख
आंतरराष्ट्रीय पर्यटनामुळे गोव्याला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस- म्हाव्हीन गुडीन्हो
दोन वर्षापासून बंद असलेले आंतरराष्ट्रीय पर्यटन सुरू असल्याने गोव्याच्या विकासाला पुन्हा एकदा नवी उभारी मिळणार आहे. कोविड नियमांचे पालन करून अनेक विदेशी पर्यटक आगामी काळात गोव्यात दाखल होणार असल्याची माहिती गोव्याचे वाहतूक मंत्री म्हाव्हीन गुडीन्हो यांनी दिली.
हेही वाचा-Corona In Satara : परदेशातून आलेल्या दाम्पत्यासह मुलगी कोरोना बाधित
महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे 20 रुग्ण
डेल्टा व्हेरियंटनंतर आता राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण (Omicron in Maharashtra) आढळून येत आहेत. राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 20 वर पोहचली (Total Omicron cases in State) आहे. यात मुंबईत 5, पिंपरी चिंचवडमध्ये 10, पुणे मनपा क्षेत्रात 2, कल्याण डोंबिवलीत 1, नागपूरमध्ये 1 आणि लातूरमध्ये 1 रूग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, कोरोना नियमांचे पालन करा व भीती बाळगू नका, असे आवाहन आरोग्य विभागाकडून नागरिकांना करण्यात येत आहे.
गोव्यातील पर्यटनाची काय आहे स्थिती-
वर्षातील शेवटचा महिना डिसेंबर महिन्यात नाताळ साजरा करण्यासाठी आणि सुट्ट्या आनंदात घालवण्यासाठी पर्यटकांची गोव्यात तोबा गर्दी होते. गेली दोन वर्ष कोरोनामुळे पर्यटनावर मंदीचं सावट होतं. आता पुन्हा व्यवसाय उभारी घेईल, असं वाटत असतानाच गोव्यावर ओमायक्रॉनचे सावट पसरले ( Tourism In Crisis Due To Omicron Variant ) आहे. नाताळ पूर्वीच गोव्यात आलेले पर्यटक परतीच्या मार्गावर फिरले आहेत. त्यामुळे येथील बहुतेक हॉटेल आणि क्लब रिकामे दिसत आहेत. शुक्रवार आणि शनिवारच्या रात्री गोव्यातील प्रसिद्ध असलेल्या क्लब कमाना आणि इतर ठिकाणी प्रवेश मिळावा म्हणून पर्यटक आटापिटा करत असायचे. आता मात्र क्लबच्या लोकांना रस्त्यावर उभे राहून पर्यटकांना बोलवावे लागत आहे.