नवी दिल्ली - शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) मोठे यश मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कृषी कायदे (Farm laws rolled back) परत घेत असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या प्रस्तावाला ( The Farm Laws Repeal Bill ) लोकसभेत मंजूरी मिळाली. देशभरातून या निर्णयाचे स्वागत होत आहे.
आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन ( Winter Session of Parliament 2021) 29 नोव्हेंबर म्हणजेच सुरू झाले आहे. आज अधिवेशनचा पहिला दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. विरोधकांनी संसदेत गोंधळ घातला. गोंधळातच तीन कृषी कायदे रद्द करण्यात आले.
देशातील शेतकऱ्यांनी 26 नोव्हेंबर 2020 पासून केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात (Farm Law) आंदोलन सुरू केले होते. आज या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. अखेर शेतकऱ्यांच्या मागणीपुढे सरकार झुकलं आणि कृषी कायदे रद्द ( Farm Laws Repealed) करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. कायदे मागे घेतले असले तरी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच राहणार आहे. आम्ही आमचा संघर्ष सुरुच ठेवणार अशी भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे. शेतमालाला कायदेशीर हमी आणि सर्व शेतमालाला योग्य भाव मिळावा, आदी मागण्यासाठी हे आंदोलन सुरूच राहणार आहे. तसेच वीज दुरुस्ती विधेयक अद्याप मागे घेतलेले नाही.
हेही वाचा - 'लक्षात घ्या...अजुनही ही लढाई सुरुच'; राहुल गांधींचे शेतकऱ्यांना पत्र