श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात रविवारी एका दहशतवाद्याला अटक करण्यात ( Terrorist arrested in Doda ) आली. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. या दहशतवाद्याकडून एक पिस्तूल, एक मॅगझीन आणि काही गोळ्या जप्त करण्यात आल्याचे ( Terrorists arrested with Chinese pistol ) अधिकाऱ्याने सांगितले.
एका गुप्त माहितीच्या आधारे, पोलिस आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त शोध पथकाने डोडा शहराच्या बाहेरून दहशतवाद्याला ( Terrorist arrested in Jammu ) पकडले, असे पोलिसांनी सांगितले.
यावर्षी १०० दहशतवादी ठार- काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यातील पालपोरा भागात रविवारी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. पोलीस महानिरीक्षक काश्मीर विजय कुमार यांचा हवाला देत, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी ट्विट केले की, गांदरबलचा लष्कर-ए-तैयबा (एलईटी) अतिरेकी आदिल परे श्रीनगरच्या क्रिस्बल पालपोरा, सांगा येथे 'संधी' चकमकीत मारला गेला. दरम्यान, या वर्षी आतापर्यंत काश्मीरमध्ये झालेल्या विविध तोफांच्या चकमकीत १०० अतिरेकी मारले गेले आहेत.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील चटपोरा भागात रविवारी रात्री उशिरा सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक अतिरेकी २० जूनला ठार झाला, असे पोलिसांनी सांगितले. हे ऑपरेशन पोलिस, लष्कराच्या 55 राष्ट्रीय रायफल्स आणि CRPF च्या 183,182 बटालियनने संयुक्तपणे केले.
हेही वाचा-Jammu & Kashmir: कुपवाडा येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार
हेही वाचा-Pulwama Encounter: पुलवामा येथे चकमक; सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांचा केला खात्मा