नवी दिल्ली : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची कन्या के. कवीता यांची आज शनिवार (11 मार्च)रोजी अंमलबजावणी संचालनालय ईडीने चौकशी झाली. उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ही सुमारे नऊ तास चौकशी झाली आहे. या चौकशीच्या बातमीमुळे ईडी कार्यालयाबाहेर उपस्थित भारत राष्ट्र समितीच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर पडले होते. चिंतेच्या रेषा दिसत होत्या. चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालय कविताला अटकही करू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, त्यांना पुढील चौकशीसाठी 16 मार्चला पुन्हा बोलावले आहे.
पक्षाचे अनेक नेते आणि आमदारही घटनास्थळी : दिल्ली अबकारी धोरण घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शनिवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी के. कविता यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. एपीजे अब्दुल कलाम रोडवरील प्रवर्तन भवनाबाहेर सकाळपासूनच प्रसारमाध्यमांची गर्दी दिसून आली. हिंदी आणि दक्षिण भारतातील प्रादेशिक मीडियाने येथे मोठी गर्दी केली होती यादरम्यान के. कविता यांच्या समर्थनार्थ पक्षाचे अनेक नेते आणि आमदारही घटनास्थळी पोहोचले होते.
राजकीय गैरवापर होत असल्याचा आरोप : सकाळी 11.02 वाजता पोलीस संरक्षणात के. कविता यांचा ताफा अंमलबजावणी संचालनालयाच्या मुख्यालयात पोहोचला. प्रवेश नोंदणी करून घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांना कार्यालयात नेले. त्यांनी मुठ घट्ट धरून आपल्या समर्थकांना एकजूट राहण्याचा संदेश दिला. त्याचवेळी बॅरिकेडपासून काही अंतरावर अनेक पक्षाचे नेते उपस्थित असून ते तपास यंत्रणेच्या कारवाईबाबत केंद्र सरकारवर हल्लाबोल करत असल्याचे दिसून आले. तपास यंत्रणांचा राजकीय गैरवापर होत असल्याचे ते म्हणाले. त्यांचा पक्ष याला कडाडून विरोध करेल असही ते म्हणाले आहेत.
याआधीही केंद्रीय अन्वेषण विभागाने कविता यांची एकदा चौकशी : पक्षाच्या नेत्यांना चिंता: ईडी कार्यालयाबाहेर उपस्थित भारत राष्ट्र समितीच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा दिसत होत्या. त्याला प्रथमच चौकशीसाठी बोलावण्यात आले. याआधीही केंद्रीय अन्वेषण विभागाने कविता यांची एकदा चौकशी केली आहे.