ETV Bharat / bharat

भाजपकडून पश्चिम बंगालमधील 2024 लोकसभा निवडणुकीची तयारी, 'हा' घेतला मोठा निर्णय - 2024 मधील लोकसभा निवडणूक

2024 मधील लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. हे लक्षात घेऊन भाजपने सीपीआयप्रमाणे नेटवर्कचे संघटन करण्याचे नियोजन केले आहे.

Target 2024 polls
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक
author img

By

Published : Jul 13, 2021, 5:52 PM IST

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्षात असलेल्या भाजपने 2024 च्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी सीपीआयप्रमाणेच (मार्क्सवादी) भाजप रणनीती आखणार आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप पूर्णवेळ विस्तारक नेमणार आहे. त्यांना दरमहा 6 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. हे विस्तारक पश्चिम बंगालमधील 78 हजार बुथसाठी काम करणार आहेत. भाजपचा तळागाळात प्रसार-प्रचार करण्याची विस्तारकांवर जबाबदारी देण्यात येणार आहे.

भाजपने पश्चिम बंगालमध्ये 2019 लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली होती. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विस्तारक नेमण्याचा विचार केला. मात्र, 2021 मध्ये भाजपचे विस्तारक नेटवर्क हे असंघटित होते. त्यामुळे भाजपला निवडणुकीत अपेक्षित परिणाम दिसून आला नाही. 2024 मधील लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. हे लक्षात घेऊन भाजपने सीपीआयप्रमाणे नेटवर्कचे संघटन करण्याचे नियोजन केले आहे.

हेही वाचा-एसईबीसी आणि ईएसबीसी उमेदवारांच्या रखडलेल्या नियुक्त्या कायम; राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय

पक्षाचे बुथपातळीवर नेटवर्क कमकुवत असल्याने भाजपला विधानसभा निवडणुकीत अपयश

पश्चिम बंगालचे भाजप उपाध्यक्ष प्रताप बंडोपाध्याय ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले, की नवीन विस्तारकांची नियुक्ती लवकरच करण्यात येणार आहे. राज्यातील संघटनात्मक बांधणी आणखी बळकट होणार आहे. 2021 मधील विधानसभा निवडणुकीचा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पंचनामा केला आहे. निवडणुकीतील अपयशाची कारणमीमांसा केली आहे. पक्षाचे बुथपातळीवर नेटवर्क कमकुवत असल्याने पक्षाला विधानसभा निवडणुकीत अपेक्षित विजय मिळाले नसल्याचे आढळले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी हा कमकुवतपणा दूर करण्यात येणार आहे.

हेही वाचा-यूपीत मारहाणीचे चित्रीकरण करताना युवकाला लागली गोळी, VIDEO व्हायरल

2019 भाजपला पश्चिम बंगालमध्ये 18 जागांवर विजय-

2019 मधील लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपला 18 जागांवर विजय मिळाला होता. या जागा कायम राखण्यासाठी पक्षाचे केंद्रीय नेतृत्व प्रयत्न करणार असल्याचे सूत्राने सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.