नवी दिल्ली - भाजप, नंतर काँग्रेस आणि नंतर जेडीयूसह विविध राजकीय पक्षांसाठी निवडणूक रणनीतीकार असलेले प्रशांत किशोर आता इतरांसाठी रणनीती बनवणार नाहीत. प्रशांत किशोर आता त्यांच्या स्वत: पक्ष काढतील अशी चर्चा सुरू झाली आहे. (Prashant Kishor tweet) किशोर यांची नवीन पक्षाची स्थापना करण्याचे संकेत आपल्या ट्विटरवरु दिले असल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. किशोर यांनी सोमवारी ट्विट करून जनतेमध्ये जाण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आहे. तसेच, त्याची सुरुवात बिहारपासून होईल असही ते म्हणाले आहेत.
-
My quest to be a meaningful participant in democracy & help shape pro-people policy led to a 10yr rollercoaster ride!
— Prashant Kishor (@PrashantKishor) May 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
As I turn the page, time to go to the Real Masters, THE PEOPLE,to better understand the issues & the path to “जन सुराज”-Peoples Good Governance
शुरुआत #बिहार से
">My quest to be a meaningful participant in democracy & help shape pro-people policy led to a 10yr rollercoaster ride!
— Prashant Kishor (@PrashantKishor) May 2, 2022
As I turn the page, time to go to the Real Masters, THE PEOPLE,to better understand the issues & the path to “जन सुराज”-Peoples Good Governance
शुरुआत #बिहार सेMy quest to be a meaningful participant in democracy & help shape pro-people policy led to a 10yr rollercoaster ride!
— Prashant Kishor (@PrashantKishor) May 2, 2022
As I turn the page, time to go to the Real Masters, THE PEOPLE,to better understand the issues & the path to “जन सुराज”-Peoples Good Governance
शुरुआत #बिहार से
प्रशांत किशोर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "लोकशाहीत प्रभावी योगदान देण्याची आणि लोकांप्रती कृती धोरणे तयार करण्यात मदत करण्याची त्यांची भूक खूप चढ-उतार झाली आहे. आता लोकांमध्ये जाण्याची वेळ आली आहे. म्हणजेच, लोकांमध्ये जेणेकरुन त्यांच्या समस्या चांगल्या प्रकारे समजून घेऊन 'जन सुरज'च्या मार्गावर वाटचाल करता येईल असही ते म्हणाले आहेत.
काँग्रेसमधील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर प्रशांत किशोर म्हणजेच पीके राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर राजकारणात मोठा बदल घडवण्याच्या तयारीत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांची पार्टी पूर्णपणे आधुनिक, डिजिटल असेल आणि जनसंपर्क करण्याच्या नवीन प्रगत तंत्रज्ञानासह लॉन्च केली जाईल. पक्षाचे नाव काय असेल याबद्दल कोणतीही अंतिम चर्चा नाही. परंतु, सूत्रांनी सांगितले की पीके एक-दोन वर्षांत त्यांचा राजकीय पक्ष सुरू करणार आहे.
प्रशांत किशोर यांचा जन्म (1977)मध्ये बिहारमधील बक्सर जिल्ह्यात झाला. त्यांची आई उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील आहे, तर वडील बिहार डॉक्टर आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव जान्हवी दास असून त्या आसाममधील गुवाहाटी येथे डॉक्टर आहेत. प्रशांत किशोर आणि जान्हवीला एक मुलगा आहे. पीकेच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर (२०१४)मध्ये मोदी सरकार सत्तेत आणल्यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. एक उत्कृष्ट निवडणूक रणनीतीकार म्हणून त्यांची ओळख आहे. निवडणुकीची रणनीती राबवण्यासाठी ते नेहमीच पडद्याआड राहिले आहेत.
वयाच्या ३४ व्या वर्षी आफ्रिकेतून युनायटेड नेशन्स (UN) ची नोकरी सोडून किशोर २०११ मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये सामील झाले. त्यानंतरच राजकारणात ब्रँडिंगचे युग सुरू झाले. मोदींच्या चाय पे चर्चा, थ्रीडी रॅली, रन फॉर युनिटी, मंथन यासारख्या प्रगत विपणन आणि जाहिरात मोहिमांचे श्रेय किशोर यांना जाते. ते इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी (I-PAC) नावाची संस्था चालवतात.
हेही वाचा - SC On Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी कोणावरही जबरदस्ती करता येणा नाही -सुप्रिम कोर्ट