ETV Bharat / bharat

... म्हणून तालिबानी दहशतवाद्यांसमोर अफगाणिस्तानच्या सैन्यदलाने मानली हार - Sanjib Kr Baruah

रेड युनिटकडून वापरण्यात येणाऱया मोहिमांमध्ये स्निपर्स आणि कमांडो घेतले जातात. तर स्थानिक मोहिमांमध्ये तालिबानी योद्धे (सैनिक) सहभाग घेतात. रेड युनिटमधील दहशतवाद्यांना कुठेही तैनात करता येईल, असे प्रशिक्षण दिले जाते. ते वेगाने स्थलांतरण करू शकतात, हे त्यांचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

तालिबानचे दहशतवादी
तालिबानचे दहशतवादी
author img

By

Published : Aug 16, 2021, 5:58 PM IST

Updated : Aug 16, 2021, 7:07 PM IST

नवी दिल्ली - अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संरक्षण दल आणि सुरक्षा दलाचा (ANDSF) तालिबानी दहशतवाद्यांसमोर टिकाव लागला नाही. तालिबानी दहशतवाद्यांचे आक्रमण सुरू असताना अफगाणिस्तानच्या सैन्यदल आणि पोलीस दलाने केवळ बघ्याची भूमिका घेतली. तालिबानी दहशतवाद्यांनी अमेरिकन बनावटीच्या सैन्यदलाची वाहने ताब्यात घेतानाही अफगाणिस्तानचे सैन्यदल काहीही करू शकले नाही. कारण, तालिबानी दहशतवाद्यांचे रेड युनिट!

सुत्राच्या माहितीनुसार तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानचे विविध प्रांत घेण्यासाठी त्यांच्या खास सुरक्षा दलाला सर्वत्र तैनात केले होते. सारा खेता (पश्तू भाषेत रेड युनिट) असे सुरक्षा दलाचे नाव आहे. हे सुरक्षा दल पायदळात लढणाऱ्या तालिबानी योद्धांकरिता महत्त्वाचा हिस्सा ठरले आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी प्रोपागंडा राबवित अफगाणिस्तानच्या तरुणांना रेड युनिटमध्ये समावेश करून घेतले आहे. रेड युनिटमधील तालिबानी योद्धे हे विशेष प्रशिक्षित, वाहनांनी सुसज्ज, अधिक शस्त्रास्त्रे असलेले आणि सैन्यदलाची उपकरणे बाळगलेली असतात.

हेही वाचा-अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा, 220 भारतीयांना घेऊन विमान दिल्लीत दाखल

असे असतात रेड युनिटमधील दहशतवादी

रेड युनिटमधील तालिबानी योद्धांच्या हातामध्ये लाल बँड असते. तर हे योद्धे पाकिस्तानमध्ये तयार झालेले चिलखत अंगावर घालतात. त्यांच्याकडे एलबो गार्ड, नी पॅड्स, स्पेशल ग्लोव्हज आणि चेस्ट रिग्ज असतात. विशेष म्हणजे त्यांच्या कालाश्निकोव्ह रायफल, टोकारेव्ह पिस्तूल, लाईट मशिन गन्स, रात्री दिसू शकणारे साधणे आणि लेसर पाँईटर असतात. त्यांना अँटी एअरक्राफ्ट गनही वापरता येतात. रेड युनिटकडून वापरण्यात येणाऱया मोहिमांमध्ये स्निपर्स आणि कमांडो घेतले जातात. तर स्थानिक मोहिमांमध्ये तालिबानी योद्धे (सैनिक) सहभाग घेतात. रेड युनिटमधील दहशतवाद्यांना कुठेही तैनात करता येईल, असे प्रशिक्षण दिले जाते. ते वेगाने स्थलांतरण करू शकतात, हे त्यांचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

हेही वाचा-काबुल विमानतळावर दुर्घटना; अफगाणिस्तानातून पळण्याच्या प्रयत्नात 5 जणांचा मृत्यू

रेड युनिटने असा वाढविला प्रभाव-

तालिबानी सुरक्षा दलामधून निवडलेले रेड युनिटचे दहशतवादी सुरुवातीला म्हणजे ऑक्टोबर 2015 केवळ शंभर होते. त्यानंतर रेड युनिटमध्ये अनेक दहशतवाद्यांना भरती करण्यात आल्याचे मानण्यात आले. हा आकडा हजारात असल्याचे मानण्यात येते. इस्लामिक स्टेट्सचा तालिबानी हक्कानी नेटवर्क व अलकायदावरील प्रभाव कमी झाला. अफगाणिस्तानमधील नानगरहार, हेलमांड आणि फराह येथे इस्लामिक स्टेट्सचा प्रभाव होता. तेव्हापासून रेड युनिट ही अफगाणिस्तानचे सुरक्षा दल, सीआएकडून प्रशिक्षण मिळालेले सैन्यदल आणि अफगाणिस्तान पोलिसांहून वरचढ ठरण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा-तालिबानने जिंकला अफगाणिस्तान ... संयुक्त राष्ट्रसंघाने आज बोलाविली आपात्कालीन बैठक

तालिबानने सर्वप्रथम 2016 मध्ये अफगाणिस्तानच्या ईशान्येत असलेल्या हेलमांडमध्ये रेड युनिट तैनात केले होते. हे रेड युनिट 2018 मध्ये अफगाणिस्तानमध्ये सर्वत्र तैनात करण्यात आले.

अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींनीही देश सोडला

तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतले आहे. सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. काबूललाही घेरले आहे. त्यामुळे अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी (President of Afghanistan Ashraf Ghani) यांनी तालिबानपुढे गुडघे टेकले आहेत. त्यांनी राजीनामा देऊन देश सोडून पळ काढला आहे.

पहिल्या विमानाने 100 भारतीय दिल्लीत दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, तालिबानने रविवारी अफगाणिस्तानातील जलालाबाद शहर ताब्यात घेतले आहे. यानंतर, आता फक्त काबूल हे अफगाणिस्तान सरकारच्या अधिकाराखाली एक मोठे शहर राहिले आहे. हे पाहता तेथे राहणाऱ्या भारतीयांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. रविवारी एअर इंडियाचे (Air India) RQ-915 हे पहिले विमान काबूलहून दिल्लीत दुपारी 2 वाजता 100 भारतीयांना घेऊन पोहोचले.

Last Updated : Aug 16, 2021, 7:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.