ETV Bharat / bharat

Suicide in Karnataka : पंतप्रधानांकडे तक्रार करणाऱ्या हिंदू युवा वाहिनीच्या राष्ट्रीय सचिवचा संशयास्पद मृत्यू - राहुल गांधी यांचा भाजप कार्यकर्त्याच्या आत्महत्येवर प्रतिक्रिाय

कनार्टकमध्ये भाजप सरकारमधील मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यानंतर काँग्रेसने ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या घटनेची दखल घेत कार्यकर्त्याच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केले आहे.

संतोष पाटील
संतोष पाटील
author img

By

Published : Apr 13, 2022, 7:40 AM IST

Updated : Apr 13, 2022, 8:18 AM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भ्रष्टाचाराची तक्रार करणाऱ्या संतोष पाटील यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पाटील हे कंत्राटदारासह ते हिंदू युवा वाहिनीचे राष्ट्रीय सचिवही होते. तसेच, भाजपचे कार्यकर्तेही होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूमुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेसकडून हा मुद्दा उचलुन धरला जात असल्याने पाटील यांच्या मृत्यूनंतर ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्विट
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्विट

पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीही सहआरोपी आहेत - ही घटना समोर आल्यानंतर राहुल गांधी यांनीही ट्विट करत पंतप्रधानांसह मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावरही निशाणा साधला आहे. 'कर्नाटकातील भाजपच्या 40 टक्के कमिशन सरकारने त्यांच्याच कार्यकर्त्याचा बळी घेतला आहे. पंतप्रधानांकडे तक्रार करूनही काहीच उत्तर मिळाले नाही. पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीही सहआरोपी आहेत, अशी टीका राहुल यांनी केली आहे. या घटनेवर थेट राहुल यांनीच लक्ष वेधल्याने पुढील काळात कर्नाटक काँग्रेसकडून या मुद्यावरून भाजपविरोधात जोरदार आंदोलन होण्याची शक्यता आहे.

ईश्वरप्पा हे आपल्या मृत्यूला कारणीभूत असतील - मंगळवारी (दि. 12 एप्रिल)रोजी सकाळी उडपी येथील एका हॉटेलमध्ये पाटीला यांचा मृतदेह आढळून आला आहे. ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मागील काही दिवसांपासून ते बेपत्ता होते. बेळगावी पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात होता. दरम्यान, या काळात पाटील यांनी त्यांच्या मित्रांना मेसेज केला होता. ईश्वरप्पा हे आपल्या मृत्यूला कारणीभूत असतील, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अस आपल्या मेसेजमध्ये पाटील यांनी म्हटले होते.

काय आहे प्रकरण? - पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. ईश्वरप्पा यांच्या सांगण्यावरून आपल्या गावातील रस्त्याच्या कामासाठी चार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. पण त्यांनी खोटेपणा, भ्रष्टाचार, अनियमितता केली, असे पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे ईश्वरप्पा यांना आपले बील देण्याच्या सुचना द्याव्यात, अशी विनंती पाटील यांनी मोदींना केली होती.

भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे - या प्रकरणात पंतप्रधानांकडे तक्रार करणाऱ्या पाटील यांनीच आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. काँग्रेसने या प्रकरणी थेट ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार म्हणाले, संतोष पाटील यांच्या मृत्यूविषयी समजले. हा खून असल्याचे सगळ्यांनाच माहित आहे. भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ईश्वरप्पा यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करायला हवा.

माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही - ईश्वरप्पा यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहे. संतोष पाटील याच्या मृत्यूशी आपला काही संबंध नाही. माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्याविरूध्द मी मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यांनी न्यायालयात लढा द्यायला हवा होता. मी त्यांना कधीच भेटलेलो नाही. त्यामुळे माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, असेही ईश्वरप्पा यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - PNB Scam Case : पीएनबी घोटाळ्यात आरोपी सुभाष शंकर परबला 26 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी

Last Updated : Apr 13, 2022, 8:18 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.