ETV Bharat / bharat

Param Bir Singh : सर्वोच्च न्यायालयाकडून परमबीर सिंग यांना अटकेपासून संरक्षण - सर्वोच्च न्यायालय

आज न्यायालयात सुनावणीदरम्यान परमबीर सिंग विदेशात गेले नसून भारतातच असल्याचे त्यांच्या वकिलाने न्यायालयात सांगितले. परमबीर यांच्या जीवाला धोका असल्यामुळे ते समोर आलेले नाहीत, असे त्यांच्यावतीने कोर्टात सांगण्यात आले.

Supreme Court grants Param Bir Singh protection from arrest in extortion case
Param Bir Singh : सर्वोच्च न्यायालयाकडून परमबीर सिंग यांना अटकेपासून संरक्षण
author img

By

Published : Nov 22, 2021, 1:09 PM IST

Updated : Nov 22, 2021, 1:17 PM IST

नवी दिल्ली - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Extortion Case) यांना फरार घोषीत करण्यात आले होते. आज न्यायालयात सुनावणीदरम्यान परमबीर सिंग विदेशात गेले नसून भारतातच असल्याचे त्यांच्या वकिलाने न्यायालयात सांगितले. परमबीर यांच्या जीवाला धोका असल्यामुळे ते समोर आलेले नाहीत, असे त्यांच्यावतीने कोर्टात सांगण्यात आले.

  • Param Bir Singh (former Mumbai Police Commissioner) is very much in the country and he is not absconding - his advocate tells the Supreme Court. pic.twitter.com/imxjQ0qxna

    — ANI (@ANI) November 22, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

येत्या तर 48 तासांमध्ये सीबीआयसमोर हजर होण्याची तयारी परमबीर यांनी दर्शवली आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने परमबीर यांना अटकेपासून संरक्षण दिलं असून तपासामध्ये सहकार्य करण्यास सांगितले आहे. 6 डिसेंबरपर्यंत परमबीर यांना अटकेपासून न्यायालयाने संरक्षण दिलं आहे.

  • Former Mumbai Police Commissioner Singh tells Supreme Court that he is ready to appear before CBI within 48 hours. Supreme Court grants protection from arrest to him and directs him to join the investigation. pic.twitter.com/0fSbDWc3va

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Ex home Minister Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटी रुपये वसुलीचा आरोप केला आहे. या प्रकरणानंतर ईडीने तपास करून अनिल देशमुख यांना अटक केली. आरोप केल्यानंतर आपल्याकडे या संदर्भातली पुरावे नाहीत, असे सांगत परमबीर सिंग यांनी देशाबाहेर पलायन केल्याची चर्चा होती. मात्र, त्यांच्या वकिलाने दावा केला आहे की, ते भारतामध्ये आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्याने ते सीबीआय कार्यालयात हजर होण्याची शक्यता आहे.

Last Updated : Nov 22, 2021, 1:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.