ETV Bharat / bharat

सुपरस्टार रजनीकांत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; चेन्नईकडे रवाना - rajanikanth got discharge news

सुपरस्टार रजनीकांत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. अपोलो रुग्णालयाने एक पत्रक प्रसिध्द केले असून रजनीकांत यांची तब्येत चांगली असल्याचे म्हटले होते.

Superstar Rajinikanth
सुपरस्टार रजनीकांत
author img

By

Published : Dec 27, 2020, 3:27 PM IST

Updated : Dec 27, 2020, 5:21 PM IST

हैदराबाद - सुपरस्टार रजनीकांत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. ते अण्णात्थे या चित्रपटाचे शुटिंग हैदराबादमध्ये करीत होते. त्यातील काही क्रू मेंबरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर शुटिंग थांबवण्यात आले होते. यानंतर 25 डिसेंबरला अचानक रजनीकांत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, रजनीकांत यांना डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर ते चेन्नईकडे रवाना झाले आहेत.

याबाबत अपोलो रुग्णालयाने एक पत्रक प्रसिध्द केले असून रजनीकांत यांची तब्येत चांगली असल्याचे म्हटले होते. त्यांच्या शुटिंग सेटवरील क्रू मेंबर्सना कोरोनाची लागण झाल्यामुळे अपोलो रुग्णालयात वैद्याकिय देखरेखेखाली ते ओयसोलेशनमध्ये राहात असल्याचे म्हटले होते.

हेही वाचा - थलैवाची राजकारणात एंट्री; 31 डिसेंबरला राजकीय पक्षाची घोषणा

शुटिंग क्रूला झाली होती कोरोनाची बाधा

"घोषणा: 'अण्णात्थे' शूटच्या रूटीन टेस्टिंग दरम्यान ४ क्रू मेंबर्सनी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तर सुपरस्टार रजनीकांत आणि इतर क्रू मेंबर्सची चाचणी अहवाल निगेटिव्ह आला. होता.

'अण्णात्थे' चित्रपटाचे सुरू होते शुटिंग

'अण्णात्थे' हा तमिळ अ‍ॅक्शन फिल्म आहे. चित्रपट शिव यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला असून कलानिथी मारन निर्मित सन पिक्चर्स या बॅनरखाली बनवला आहे. या चित्रपटात रजनीकांत, मीना, खुशबू, कीर्ती सुरेश, नयनथारा, प्रकाश राज आणि जॅकी श्रॉफ यांच्यासह मुख्य भूमिकेत आहेत.

मे २०२० रोजी सन पिक्चर्सने घोषित केले होते ती अण्णात्थे पोंगल सणाच्यावेळी (संक्रांत) रिलीज होणार आहे. तथापि, कोविड उद्रेकानंतरच्या विलंबामुळे हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे.

Last Updated : Dec 27, 2020, 5:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.