नवी दिल्ली/इंदूर - सुल्ली डिल अॅप प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मोठी कारवाई ( Sulli Deal App Mastermind Arrested ) केली आहे. हे अॅप तयार करणारा मास्टरमाईंंड ओंकारेश्वर ठाकूर ( वय 25 वर्षे) याला इंदूरमधून पोलिसांनी ( Sulli Deal App Mastermind Arrested indore ) अटक केली आहे. बुल्लीबाई अॅप प्रकरणात ( Bulli Bai App Case ) अटक केलेल्या नीरज बिष्णोईकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
सहाय्यक पोलीस उपायुक्त यांनी दिलेल्या माहितीनूसार, ओंकारेश्वर हा जानेवारी 2020 साली @gangescion या ट्विटर हँडलवरुन ट्रेड महासभा ग्रुप मध्ये सहभागी झाला होता. या ग्रुपमध्ये मुस्लीम महिलांना ट्रोल करण्याबाबत चर्चा होत असे. त्यानंतर त्याने सुल्ली डिल अॅप गिटहबवर बनवले. ज्यावेळी सुल्ली डिल अॅप वरुन देशात गदारोळ सुरु झाला, तेव्हा त्याने आपली सर्व माहिती सोशल मीडियावरुन काढून टाकली. बुल्ली बाई अॅप प्रकरणी ( Bulli Bai App Case ) अटक करण्यात आलेल्या नीरज बिष्णोईने सुल्ली डिल अॅप ( Sulli Deal App ) प्रकरणातील आरोपींशी त्याचे संबंध असल्याचे सांगितले. या माहितीवरुन दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने इंदूरमध्ये छापा टाकून तेथून ओंकारेश्वर ठाकूरला अटक केली. २५ वर्षीय ओंकारेश्वरने इंदूर येथील आयपीएस अकादमीतून बीसीए केले आहे.
चौकशीदरम्यान ओंकारेश्वरने सांगितले की, मुस्लिम महिलांना ट्रोल आणि बदनाम करण्याच्या हेतूने त्याने हे अॅप तयार केले होते. गिटहब त्याने या अॅपची निर्मिती केली. तो ज्या ट्विटर ग्रुपचा सदस्य होता, त्या सर्व ग्रुप सदस्यांकडे अॅपचे नियंत्रण होते. त्यांनी काही मुस्लिम महिलांचे फोटो ट्विटर वरती टाकून त्यांनी लिलाव केला होता.
काय आहे प्रकरण?
Bulli Bai आणि Sulli Deal या अॅपमध्ये काही अंतर नाही. दोन्ही अॅप्सचा माध्यमातून मुस्लिम महिलांचं मानसिक आणि शारिरीक शोषण करण्याचा उद्देश होता. दोन्ही अॅपमध्ये मुस्लिम महिलांचे फोटो आणि त्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. महिलांच्या ट्विटवर, इन्स्टाग्राम आणि फेबसुकवरुन माहिती घेत त्यांचे फोटो चोरी करत टाकण्यात येत आणि त्यांचा लिलाव केला जाई.
हेही वाचा -Bulli Bai App Case : 'माझी बहिण निर्दोष', श्वेता सिंहची धाकटी बहिण माध्यमांसमोर...