ETV Bharat / bharat

Ultra Processed Foods : अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडच्या अधिक सेवनाने होऊ शकतो मृत्यू

author img

By

Published : Nov 7, 2022, 5:59 PM IST

आरोग्य उत्तम राखण्यासाठी किंवा योग्य आहारासाठी अनेक शोध करण्यात येत असतात. भारतामध्ये आधी सामान्य खाण्या-पिण्याच्या पद्धती होत्या, त्यांच्यामध्ये आता बदल होत असून; सध्या लोक जास्तीत जास्त जंक फूडचं म्हणजेच अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड सेवन करू लागली आहेत. मात्र हे खाद्य पदार्थ आरोग्याला हानिकारक (ULTRA PROCESSED FOODS TO PREMATURE DEATHS) असल्याचे, संशोधनामधुन पुढे आले आहे. NEED TO BE AWARE IN TIME . ULTRA PROCESSED FOODS .

ULTRA PROCESSED FOODS
अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड

आरोग्य उत्तम राखण्यासाठी किंवा योग्य आहारासाठी अनेक शोध (ULTRA PROCESSED FOODS TO PREMATURE DEATHS) करण्यात येत असतात. भारतामध्ये आधी सामान्य खाण्या-पिण्याच्या पद्धती होत्या, त्यांच्यामध्ये आता बदल होत असून सध्या लोक जास्तीत जास्त जंक फूडचं सेवन करू लागली आहेत. जगातील इतर देशांच्या तुलनेत पश्चिमेकडील देशांमध्ये प्रोसेस्ड फूडचं सेवन जास्त प्रमाणात करण्यात येतं. सध्या अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडचं सेवन करण्यात येऊ लागलं आहे. संयुक्त राज्यांमध्ये जास्तीत जास्त लोक एका दिवसामध्ये 61 टक्क्यांपेक्षा अधिक अल्ट्राप्रोसेस्ड पदार्थांचे सेवन करतात. NEED TO BE AWARE IN TIME . ULTRA PROCESSED FOODS .

ULTRA PROCESSED FOODS
अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड

तुमचं आयुष्य 14 टक्क्यांनी कमी : अल्ट्राप्रोसेस्ड फूडच्या सेवनाने माणसाचं आयुष्य कमी होत असल्याचे, फ्रान्समध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनातून सिद्ध झालं आहे. संशोधनातून असं सिद्ध झालं की, जर तुम्ही तुमच्या जेवणात 10 टक्के अल्ट्राप्रोसेस्ड फूड वापरत असाल तर तुमचं आयुष्य 14 टक्क्यांनी कमी होतं.

अल्ट्राप्रोसेस्ड फूड कसं ठरतं नुकसानदायी? : अल्ट्राप्रोसेस्ड फूड तयार करण्यासाठी व अधिक काळ टिकविण्यासाठी काही कॉस्मेटिक पद्धतीचा वापर करण्यात येतो.अल्ट्राप्रोसेस्ड फूडचं सेवन जास्तकरून स्नॅक्स, डेजर्ट किंवा रेडी-टू-ईट पदार्थांमध्ये करण्यात येतो.

57,000 जणांचा मृत्यू : सर्व वयोगट आणि लिंग वर्गामध्ये, अभ्यास केलेल्या कालावधीत असे लक्षात आले की, ब्राझीलमधील एकूण अन्न सेवनाच्या 13% ते 21% पर्यंत अल्ट्राप्रोसेस्ड फूडचा वापर होता. 2019 मध्ये 30 ते 69 वयोगटातील एकूण 541,260 प्रौढांचा अकाली मृत्यू झाला, त्यापैकी 261,061 हे प्रतिबंध करण्यायोग्य, असंसर्गजन्य आजारांमुळे होते. तर उरलेल्या ईतर लोकांचा मृत्यू हा अल्ट्राप्रोसेस्ड फूडमुळे झाला होता. मॉडेलमध्ये असे आढळून आले की, त्या वर्षी अंदाजे 57,000 मृत्यू हे अल्ट्राप्रोसेस्ड फूडच्या सेवनामुळे झाले होते. संशोधकांनी असे सुचवले आहे की, युनायटेड स्टेट्स, कॅनडा, यूके आणि ऑस्ट्रेलिया सारखे उत्पन्न असलेले देश, जेथे एकूण उष्मांकाच्या निम्म्याहून अधिक अल्ट्राप्रोसेस्ड फूडचा वाटा आहे. त्यामुळे तिथे होणारे परिणाम अधिक घातक असेल.

रासायनिक तत्वांचा वापर : अल्ट्राप्रोसेस्ड फूड सामान्यतः रासायनिक तत्वांच्या उपयोगातून तयार करण्यात येतात. त्यामुळे ते जास्तीत जास्त दिवस टिकण्यास मदत होते. अल्ट्राप्रोसेस्ड फूडमध्ये साखर, मीठ, तेल आणि फॅट्सचा अधिक प्रमाणात उपयोग करण्यात येतो. अल्ट्राप्रोसेस्ड फूड तयार करण्यासाठी अत्यंत सोयीस्कर असून स्वादिष्टही असतं. यांना रेडी-टू-ईटच्या कॉन्सप्टने तयार करण्यात येतं. परंतु हे तयार करताना आरोग्याचे मुद्दे लक्षात घेतले जात नाहीत. अल्ट्राप्रोसेस्ड फूड मधील घटक याप्रमाणे असतात- योग्य प्रमाणात फायबर नाही, मीठाचे प्रमाण जास्त, अधिक प्रमाणात ओमेगा 6 फॅटी अ‍ॅसिड असतं, अधिक ओमेगा - 3 फॅटी अ‍ॅसिड असतं, अधिक ब्रांक्ड-चेन एमिनो अ‍ॅसिड असतं, नायट्रेड मोठ्या प्रमाणावर असतं, फ्रुक्टोजचे प्रमाणही अधिक असते.

काली मृत्यू टाळता येतील : डॉ. निल्सन यांनी नमूद केले की अल्ट्राप्रोसेस्ड फूडने ब्राझीलमध्ये कालांतराने तांदूळ आणि सोयाबीनसारख्या पारंपारिक संपूर्ण खाद्यपदार्थांच्या वापराची जागा घेतली आहे. अल्ट्राप्रोसेस्ड फूड चा वापर कमी करणे आणि निरोगी अन्न निवडींना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक हस्तक्षेप आणि सार्वजनिक आरोग्य उपायांची आवश्यकता असू शकते, जसे की वित्तीय आणि नियामक धोरणे, अन्न वातावरण बदलणे, अन्न-आधारित आहार मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी मजबूत करणे आणि ग्राहकांचे ज्ञान, दृष्टीकोन आणि वर्तन सुधारणे. अल्ट्राप्रोसेस्ड फूडचा वापर 10% ते 50% पर्यंत कमी केल्यास ब्राझीलमध्ये दरवर्षी अंदाजे 5,900 ते 29,300 अकाली मृत्यू टाळता येतील.

अल्ट्राप्रोसेस्ड फूडचा वापर हानिकारक : डॉ. निल्सन म्हणाले की, अल्ट्राप्रोसेस्ड फूडचे सेवन हे लठ्ठपणा, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मधुमेह, काही कर्करोग आणि इतर रोगांसारख्या अनेक रोगांच्या परिणामांशी निगडीत आहे आणि हे ब्राझिलियन प्रौढांमध्ये टाळता येण्याजोगे आणि अकाली मृत्यूचे एक महत्त्वाचे कारण आहे. अल्ट्राप्रोसेस्ड फूडचा वापर फक्त दशकापूर्वीच्या पातळीपर्यंत कमी केल्याने, संबंधित अकाली मृत्यू 21% कमी होतील. या पदार्थांचा वापर कमी करणाऱ्या धोरणांची तातडीने गरज आहे.'

प्रभावी अन्न धोरण राबविणे गरजेचे : अल्ट्राप्रोसेस्ड फूडच्या सेवनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा अंदाज लावता येतो. या सगळ्या गोष्टींचा परिणाम आरोग्यावर होऊ नये यासाठी, प्रत्येक देशाने पोष्टिक अन्न पुरविण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. अधिक प्रभावी अन्न धोरण पर्यायांची रचना करायला हवी. प्रीपॅकेज केलेले सूप, सॉस, फ्रोझन पिझ्झा, खाण्यासाठी तयार जेवण, हॉट डॉग, सॉसेज, सोडा, आइस्क्रीम आणि स्टोअरमधून विकत घेतलेल्या कुकीज, केक, कँडी आणि डोनट्स हे अल्ट्राप्रोसेस्ड फूडची उदाहरणे आहेत. NEED TO BE AWARE IN TIME . ULTRA PROCESSED FOODS .

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.