ETV Bharat / bharat

अशी दूर करा पाठदुखी, डॉ. जान्हवींनी सांगितलाय हा सोपा उपाय - Yoga latest news

एकाग्रता वाढवण्याबरोबरच प्रार्थना पद्धतीः मेडिटेशनची एक सुयोग्य असा मार्ग निवडा आणि पाठीसह पाठीच्या कण्यातील कोणत्याही वेदनेपासून मुक्ति मिळण्यासाठी हा अत्यंत सहाय्यकारी ठरतो.

योगा; पाठदुखीवर प्रभावकारी उपाय
योगा; पाठदुखीवर प्रभावकारी उपाय
author img

By

Published : Mar 2, 2021, 3:09 PM IST

Updated : Mar 2, 2021, 5:13 PM IST

मानसिक तणावाची परिणती पाठदुखीमध्ये होऊ शकते, योगासने हाच योग्य उपाय योगशास्त्रानुसार, पाठदुखीची वर्गवारी दोन प्रकारात करता येते. अधिज(तणावामुळे उत्पन्न झालेली पाठदुखी) आणि अनाधिज( कोणत्याही तणावाशिवायच उत्पन्न झालेली). ही संकल्पना मानवजातीला ज्ञात असलेल्या सर्वात प्राचीन ज्ञानभंडार असलेल्या वेदांमध्ये दिली आहे. महर्षी वसिष्ठ यांनी हीच कल्पना अधिव्याधी या नावाने अधिक स्पष्ट करून सांगितली आहे. ज्यात कोणत्याही आजाराची शारिरिक आणि मानसिक कारणे नमूद केली आहेत. प्रख्यात फिजिओथेरपीस्ट, अल्टरनेटिव्ह मेडिसिन शाखेच्या डॉक्टर आणि योग शिक्षिका डॉ. जान्हवी कथरानी यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे. त्या म्हणतात की, योग विज्ञान कोणत्याही मनुष्याच्या तीन रचनांच्या तत्वज्ञानावर लक्ष

योगा; पाठदुखीवर प्रभावकारी उपाय
योगा; पाठदुखीवर प्रभावकारी उपाय
केंद्रित करते.

• सर्वंकष शरीर भौतिक शरीर(डोळ्यांनी दिसणारे)
• अंतर्गत शरीरः मानसिक रचना, प्राणतत्व आणि बौद्धिक शरीर
• सूक्ष्म शरीरः आत्मा

  • अधिव्याधी कल्पनेत असे म्हटले आहे की, कोणतेही आजार हे तणावातून निर्माण होतात किंवा तणावाशिवायही निर्माण होणारे काही आजार आहेत.

१. अधिज(तणावातून निर्माण होणारे आजार) हा आजार एक प्रकारचा मानसिकतेशी संबंधित पैलू असून त्याचा शारिरीक दुखापतीशी काहीही संबंध नसतो. पाठदुखी ही तिच्या शारिरीक आविष्काराशी दुय्यमरित्या जोडलेली असते. पाठीत होणारी कोणत्याही वेदनेचे मूळ कारण हे कोणताही मानसिक किंवा भावनिक तणाव किंवा नैराश्य आणि चिंता असते. शरिरातील चालणारी नाडी(उर्जा प्रवाह) ही प्राणतत्वाच्या उर्जेचा मार्ग आहे.

२. अनाधिज(तणावविरहित पाठदुखी) या प्रकारच्या पाठदुखीचे कारण कोणतीही दुखापत, प्रचंड कष्ट करून आलेला थकवा किंवा दिर्घकाळ थकवा जाणवत रहाणे हे असते. पाठीच्या कण्यात काही कारणाने विकृती निर्माण झाल्यास होणारे बदल हे या वर्गात मोडतात. मानसिक, भावनिक किंवा बौद्धिक तणावाशी संलग्न नसलेले कोणतेही कारण पाठदुखीच्या अनाधिज या संकल्पनेत येते.

या वर्गवारीतील पाठदुखीसाठी शारिरीक मजबुतीवर तसेच पाठीचे स्नायु आणि हाडांची अवस्था सुधारण्यावर तसेच पाठीच्या मणक्यावर लक्ष केंद्रित करावे लागते. आणि हे योगासनांनी, प्राणायामाने तसेच मेडिटेशन पद्घतींचा अवलंब करून करता येणे शक्य आहे. रूग्णाच्या शक्तिवर कमीत कमी परिणाम होईल या पद्धतीने रोजचा सराव करण्यासाठी
समुपदेशन सहाय्यकारी ठरू शकते. वर दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, कोणत्याही स्वरूपाची पाठदुखी ही एकतर प्राथमिक किंवा दुय्यमपणे मानसिक तणाव आणि शारिरीक समस्यांशी जोडलेली असते, असे आपण म्हणू शकतो. कोणत्याही पाठदुखीवर त्या त्या प्रकारानुसार व्यायाम करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची आपल्याला गरज आहे.

योगा; पाठदुखीवर प्रभावकारी उपाय
योगा; पाठदुखीवर प्रभावकारी उपाय

योगाच्या माध्यमातून पाठदुखीवरील व्यायाम

• योगशिक्षकांकडून समुपदेशन करून घेतल्यास मानसिक, भावनिक आणि बौद्धिक(व्यावसायिक) तणाव आणि त्याच्याशी संबंधित समस्यांचे निराकरण केले जाते.

• कपालभाती(फुफ्फुसांचा खालचा भाग आणि ओटीपोटाच्या स्नायुंना आलेला थकवा दूर करण्यासाठी शुद्धिकरण), जल नीती(नाकपुड्यांच्या द्वारे श्वसनाच्या मार्गाचे कोमट मिठाचे पाणी घेऊन शुद्घिकरण), वमन धौती( फुफ्फुसातील सर्व अतिरिक्त कफ काढून टाकण्यासाठी आणि पोटातील आम्ल काढण्यासाठी शुद्धिकरण).शंखप्रक्षालन(आतडे आणि शरिरातील रोगजंतुमुळे निर्माण होणारे विषयुक्त पदार्थ दूर करण्यासाठी) अशा शुद्धिकरणाच्या प्रक्रिया आवश्यक आहेत.

योगा; पाठदुखीवर प्रभावकारी उपाय
योगा; पाठदुखीवर प्रभावकारी उपाय

• प्राणायामः शरिराच्या सर्व पैलूंमध्ये प्राणतत्वाचा किंवा प्राणिक उर्जेला प्रवाहित करणे. नाडी शुद्धी यालाच नाडी शोधन प्राणायाम असेही म्हणतात (अनुलोम विलोम). ही पद्घती शारिरीक उर्जेचे संतुलन राखत असल्याने अत्यंत परिणामकारक ठरते आणि तिचा आविष्कार आपल्याला मानसिक शांतीतून पहाता येतो.

• योगासनेः योगासने ही शारिरीक मजबुती आणि पाठीच्या स्नायुंची तसेच हाडांची सहनशक्ति वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत तसेच पाठीच्या मणक्यांमध्ये त्यामुळे उर्जेचा प्रवाह वाहता होतो.

• एकाग्रता वाढवण्याबरोबरच प्रार्थना पद्धतीः मेडिटेशनची एक सुयोग्य असा मार्ग निवडा आणि पाठीसह पाठीच्या कण्यातील कोणत्याही वेदनेपासून मुक्ति मिळण्यासाठी हा अत्यंत सहाय्यकारी ठरतो. कृपया, यासाठी एखाद्या व्यावसायिक योगा थेरपी तज्ञाशी संपर्क साधा. कोणत्याही शंकांसाठी, डॉ. जान्हवी कथरानी यांच्याशी jk.swasthya108@gmail.com यावर संपर्क करा.

Last Updated : Mar 2, 2021, 5:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.