ETV Bharat / bharat

जोधपूरच्या कांकणी गावात बसवणार सलमानने शिकार केलेल्या चिंकारा काळ्या हरणाचा पुतळा - काळ्या हरणाच्या पुतळ्याचे काम पूर्ण

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने शिकार केलेल्या चिंकारा काळ्या हरणाच्या पुतळ्याचे काम पूर्ण झाले आहे. जोधपूरच्या कांकणी गावात सुमारे 7 बिघा जागेवर या कृष्ण हरणाचे स्मारक उभारले जात आहे Kankani Black Buck Case.

जोधपूरमध्ये बसवणार सलमानने शिकार केलेल्या चिंकारा काळ्या हरणाचा पुतळा

author img

By

Published : Aug 12, 2022, 5:11 PM IST

जोधपूर (राजस्थान) कांकणी गावात काळ्या हरणाचे स्मारक उभारले जात आहे. कृष्ण मृग चिंकारा जातीच्या या काळ्या हरणाचा पुतळाही तयार झाला आहे Kankani Black Buck Case. येत्या 20 दिवसांत ते येथे ते बसवले जाईल. ऑक्टोबर 1998 मध्ये सलमान खानने शिकार केलेल्या हरणांना जिथे दफन करण्यात आले होते, त्या ठिकाणी हे स्मारक बांधले जात आहे. मंदिरासारखे स्मारक उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे.

येत्या पंधरा वीस दिवसांत हे काम पूर्ण होईल, असे या बांधकामाशी संबंधित प्रेमाराम सरन यांनी सांगितले. त्यानंतर मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल. जोधपूरचे कारागीर शंकर यांनी हा पुतळा तयार केला आहे. लोकांनी शिकार करु नये, काळ्या हरणांना संरक्षण मिळावे, हा येथे पुतळा उभारण्याचा उद्देश आहे. कारण या परिसरात कधीकाळी हरणांचे कळप दिसत होते. मात्र कडक कारवाई होत नसल्याने आणि शिकारीच्या वाढत्या घटनांमुळे त्यांची संख्या कमी होत आहे. सुमारे 7 बिघा जागेवर कृष्ण हरणाचे स्मारक उभारले जात आहे. पुतळा तयार करण्यात लोखंड आणि सिमेंटचा वापर करण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे 15 दिवस लागले.

हम साथ साथ च्या शूटिंगदरम्यान शिकार सप्टेंबर 1998 मध्ये सलमान खान हम साथ साथ है या हिंदी चित्रपटाच्या शूटिंगसाठी आला होता. सलमान खानवर त्या काळात शिकार केल्याचा आरोप होता Protection of Black Bucks. 27-28 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर 1998 च्या रात्री जोधपूरमधील घोडा फार्म हाऊस आणि भावड गावात कांकणीमध्ये दोन कृष्ण हरणांची शिकार केल्याचा आरोप सलमानवर होता. त्यानंतर सलमान खानला अटक केली होती. यामध्ये सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा झाली होती. बाकी सर्व निर्दोष सुटले होते. सोनाली बेंद्रे आणि नीलम यांना वर्षांनंतर साक्षीदार ओळखू शकले नाहीत, त्यामुळे त्यांनाही या प्रकरणात फायदा झाला.

हेही वाचा - यती नरसिम्हानंद सरस्वती यांचा हर घर तिरंगा अभियानाला विरोध, वाचा नेमके काय म्हणाले ते

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.