ETV Bharat / bharat

SCR Apprentice 2023 : दक्षिण मध्य रेल्वेमध्ये 4103 शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी जागा, 29 जानेवारी पर्यंत करा अर्ज

दक्षिण मध्य रेल्वेमधील (SCR) (South Central Railway) विविध ट्रेडमध्ये 4100 हून अधिक शिकाऊ उमेदवारांच्या जागा (SCR Apprentice 2023) निघाल्या आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 30 डिसेंबरपासून सुरू झाली आहे आणि शेवटची तारीख 29 जानेवारी (Apply by 29 January 2023) आहे. 10वी उत्तीर्ण आणि आयटीआय (ITI) केलेल्या कमाल 24 वर्षे वयाच्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावा.

author img

By

Published : Jan 3, 2023, 3:36 PM IST

SCR Apprentice 2023
शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी जागा

रेल्वे मध्ये (South Central Railway) नोकरी करु इच्छिनाऱ्या तरुणांकरीता एक आनंदाची बातमी आहे. दक्षिण मध्य रेल्वेमधील (SCR) विविध ट्रेडमध्ये 4100 हून अधिक शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी (4103 Apprentice Vacancies in SCR) अर्ज प्रक्रिया 30 डिसेंबरपासून सुरू झाली आहे आणि शेवटची तारीख 29 जानेवारी (Apply by 29 January 2023) आहे. 10वी उत्तीर्ण आणि आयटीआय (ITI) केलेल्या कमाल 24 वर्षे वयाच्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावा. SCR Apprentice 2023

सर्वाधिक 1460 पदे : दक्षिण मध्य रेल्वेने त्याच्या विविध कॅरेज वर्कशॉप्स, वॅगन वर्कशॉप्स, लोको शेड्स, डेपो इत्यादींमध्ये विविध ट्रेडमध्ये 4000 हून अधिक शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. दक्षिण मध्य रेल्वे (SCR) द्वारे 30 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध झालेल्या शिकाऊ भरती अधिसूचनेनुसार, AC मेकॅनिक, सुतार, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, मशिनिस्ट, मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स, मिलिंटन, मशीनी, मॅकेनिक अशा एकूण 4103 शिकाऊ उमेदवारांची भरती करण्यात आली आहे. यापैकी सर्वाधिक 1460 पदे फिटर ट्रेडमधील आणि 1019 इलेक्ट्रिशियन ट्रेडमधील आहेत.

प्रशिक्षणार्थी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया : दक्षिण मध्य रेल्वेने जाहिरात केलेल्या 4000 हून अधिक शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार SCR च्या अधिकृत वेबसाइट, scr.indianrailways.gov.in वर दिलेल्या सक्रिय लिंकवरून किंवा थेट लिंकवरून ऑनलाइन अर्ज पृष्ठाला भेट देऊन अर्ज करू शकतात. 30 डिसेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, उमेदवार 29 जानेवारी 2023 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज करू शकतील. अर्जादरम्यान उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून १०० रुपये शुल्क भरावे लागेल. तथापि, SC आणि ST प्रवर्गातील उमेदवार तसेच सर्व महिला उमेदवारांसाठी फी पूर्णपणे माफ आहे.

प्रशिक्षणार्थी भरतीसाठी पात्रता निकष : दक्षिण मध्य रेल्वेमधील विविध ट्रेड्ससाठी शिकाऊ पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि रिक्त पदांच्या संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, 30 डिसेंबर 2022 रोजी उमेदवारांचे वय 15 वर्षांपेक्षा कमी आणि 24 वर्षांपेक्षा जास्त नसावे. SAC आणि ST श्रेणीतील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ५ वर्षे आणि OBC-NCL साठी ३ वर्षे शिथिल आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.