सेंच्युरियन India Vs South Africa 1st Test : सेंच्युरियनमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना एक डाव आणि ३२ धावांनी गमावलाय. गुरुवारी (२८ डिसेंबर) सामन्याच्या तिसर्या दिवशी भारताचा संघ दुसऱ्या डावात १३१ धावांवर सर्वबाद झाला होता. त्याआधी भारतानं पहिल्या डावात २४५ धावा केल्या होत्या. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात ४०८ धावा केल्या होत्या. त्यामुळं आफ्रिका संघाकडं पहिल्या डावात १६३ धावांची आघाडी होती. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयात डीन एल्गर, मार्को जॅन्सेन आणि कागिसो रबाडानं मोलाचं योगदान दिलं. हा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
भारताचं स्वप्न पुन्हा भंगलं : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाचा एक डाव आणि ३२ धावांनी पराभव झाला. या पराभवासह दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचं भारताचं स्वप्न पुन्हा भंगलं आहे. भारत आता दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत फक्त बरोबरी करू शकतो.
भारतीय संघ 245 धावांत सर्वबाद : पहिल्या डावात भारतीय संघ अवघ्या 245 धावांत सर्वबाद झाला होता. तर दुसऱ्या डावात संपूर्ण संघ केवळ 131 धावांवर आटोपला होता. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्या डावात 408 धावा केल्या होत्या. यावेळी भारताची शेवटची विकेट विराट कोहलीच्या रूपानं पडली होती. 76 धावा केल्यानंतर मार्को यानसेनच्या चेंडूवर तो कागिसो रबाडाच्या हाती झेलबाद झाला. त्यामुळं भारताला एक डाव आणि 32 धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे.
भारताची खराब सुरुवात : पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संघ पहिल्या डावात 245 धावांत सर्वबाद झाला होता. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात 408 धावांवर बाद झाला. आफ्रिकनं संघानं दुसऱ्या डावात भारताला केवळ 131 धावांवर ऑलआउट केलं.
दक्षिण आफ्रिकेसाठी डीन एल्गरनं ठोकलं शतक : डीन एल्गरनं दक्षिण आफ्रिकेसाठी शतक झळकावलं. एल्गरनं 287 चेंडूंचा सामना केला, ज्यामध्ये त्यानं 28 चौकारांच्या मदतीनं 185 धावा केल्या. तर, मार्को जेन्सननंही 11 चौकार, एका षटकाराच्या मदतीनं 84 धावांची खेळी केली. एल्गरच्या शतकी खेळीमुळं त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
हेही वाचा -