अंबाला हरियाणातील अंबाला येथे एकाच कुटुंबातील सहा जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडले death of 6 people of same family आहेत. मृतांमध्ये 5 आणि 7 वर्षांच्या दोन मुलींचाही समावेश आहे. आज सकाळी कुटुंबातील 6 लोकांचे मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळले . बलाना गावातील लोकांच्या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू केला.
अंबाला येथील बलाना गावात एकाच कुटुंबातील ६ जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. डीएसपी जोगिंदर शर्मा यांनी सांगितले की, एकाच कुटुंबातील 6 लोकांचे मृतदेह सापडले आहेत. पोलीस सध्या तपास करत आहेत. मृतांमध्ये संगत राम, त्यांची पत्नी महिंद्रो कौर, मुलगा सुखविंदर सिंग, सून रीना, नातवंडे आशु आणि जस्सी यांचा समावेश आहे. यातील एका मुलीचा आज वाढदिवस असल्याचे सांगण्यात येत आहे. सुखविंदर हा यमुनानगर येथील एका खासगी कंपनीत कामाला होता.पोलीस सध्या सुसाईड नोटच्या आधारे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोटही सापडली आहे. या दोन पानी सुसाईड नोटमध्ये आत्महत्येला यमुनानगर येथील दोन कुटुंबीयांना जबाबदार असल्याचे सांगण्यात आले आहे. या नोटनुसार हे दोघेही सुखविंदरकडे जबरदस्तीने 10 लाख रुपयांची मागणी करत होते. न दिल्यास कुटुंबाचे नुकसान करू, अशी धमकी त्यांनी दिली होती. दोन्ही आरोपी सुखविंदर ज्या कंपनीत काम करतात त्याच कंपनीतही असल्याची माहिती आत्महत्येच्या पत्रावरून समोर येत आहे. त्यांच्या मृत्यूची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी असे ही या नोट मधे लिहिले आहे.
मृतांमधे संगत राम, वय 65 वर्षे, संगत राम यांच्या पत्नी महिंद्रा कौर, संगत राम यांचा मुलगा सुखविंदर सिंग, वय सुमारे 34 वर्षे, सुखविंदर सिंग यांची पत्नी रीना, सुखविंदर सिंग यांची मुलगी आशु, वय 5 सुखविंदर सिंग यांची मुलगी जस्सी, वय ७ यांचा समावेश आहे. कुटुंबातील 6 लोकांचे मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे
हेही वाचा Sonali Phogat final rites held in Hisar सोनाली फोगटवर अंत्यसंस्कार, मुलगी यशोधरा हिने दिला अग्नी