ETV Bharat / bharat

Shraddha Murder Case : आरोपी आफताबवर तलवारीने हल्ला, दोघांना अटक

श्रद्धा हत्याकांडातील (Shraddha Murder Case) आरोपी आफताब पूनावालाला घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनवर दोन जणांनी तलवारीने हल्ला केला. (Aftab attacked by sword). दिल्ली पोलीसांनी दोघांनाही अटक केली आहे. दिल्लीतील एफएसएल कार्यालयाबाहेर हा हल्ला झाला आहे. हल्लेखोरांनी ते हिंदू सेनेचे कार्यकर्त्ये असल्याचा दावा केला आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 28, 2022, 7:16 PM IST

Updated : Nov 28, 2022, 10:06 PM IST

नवी दिल्ली : श्रद्धा हत्याकांडातील (Shraddha Murder Case) आरोपी आफताब पूनावालाला घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनवर दोन जणांनी तलवारीने हल्ला केला. (Aftab attacked by sword). दिल्ली पोलीसांनी दोघांनाही अटक केली आहे. दिल्लीतील एफएसएल कार्यालयाबाहेर हा हल्ला झाला आहे. हल्लेखोरांनी ते हिंदू सेनेचे कार्यकर्त्ये असल्याचा दावा केला आहे.

आरोपी आफताबवर तलवारीने हल्ला

आफताबला न्यायालयीन कोठडी : दिल्लीच्या साकेत न्यायालयाने श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दिल्ली पोलीस श्रद्धा वालकर खून प्रकरणाचा तपास करत आहेत ज्यात तिचा तिच्या लिव्ह-इन पार्टनर आफताबने गळा दाबून खून केला होता. त्याने राष्ट्रीय राजधानीच्या छतरपूर भागात टाकण्यापूर्वी तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले होते.

ड्रग्ज पेडलरला सुरत येथून अटक : श्रद्धा हत्या प्रकरणात सुरतमध्ये आफताबशी संबंध असल्याच्या संशयावरून अमली पदार्थ विकणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. गुजरात पोलिसांनी ड्रग्स तस्कर फैजल मोमीन याला सुरतमध्ये ड्रग्जच्या छाप्यादरम्यान अटक ( Drug peddler arrested ) केली आहे. फैसल हा आफताबचाही ड्रग्ज सप्लायर असल्याचा संशय आहे. तो वसई पश्चिमेतील आफताबच्याच घरात राहिला होता.

श्रद्धा हत्या प्रकरणाचे गुजरात कनेक्शन ? - फैजल आणि आफताबचे अनेक कॉमन मित्र आहेत. आफताब त्याच्या संपर्कात कसा होता हे जाणून घेण्यासाठी गुजरात पोलीस फैजलच्या कॉल रेकॉर्डवरून तपास करणार आहेत. आफताब आणि श्रद्धाच्या अनेक मित्रांनी सांगितले की, आफताब ड्रग्ज सेवन करत असे. श्रद्धा हत्याकांड प्रकरण आता गुजरातशी जोडले गेले आहे. गुजरात पोलिसांनी सुरतमधून एका ड्रग्ज तस्कराला अटक केली, जो आफताबचा ड्रग सप्लायर असल्याचा संशय आहे.

आफताबच्या ड्रग्स पुरविणारा अटकेत - अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज तस्कराचे नाव फैसल मोमीन असे असून तो आफताबचा ड्रग्ज सप्लायर असल्याचा संशय आहे. कारण फैसल वसई पश्चिम येथे राहत होता. आफताब श्रद्धासोबत दिल्लीला जाण्यापूर्वी त्याच परिसरात राहिला होता. गुजरात पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फैसल आणि आफताब यांचे परस्पर मित्र असावेत असा संशय असल्याने पोलिस फैसलचे फोन रेकॉर्ड तपासतील.

आफताबने मानवी शरीरशास्त्राबद्दल वाचले होते : दिल्ली पोलिसांच्या चौकशीत आफताबने 18 मे रोजी श्रद्धाची हत्या केली आणि नंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना सुरू केली. त्याने पोलिसांना सांगितले की त्याने मानवी शरीरशास्त्राबद्दल वाचले होते. जेणेकरून त्याचा मृतदेह कापण्यात मदत होईल. पोलिसांनी सांगितले की, आफताबने गुगलवर शॉपिंग मोडमध्ये शोध घेतल्यानंतर काही रसायनांनी जमिनीवरील रक्ताचे डाग स्वच्छ केले आणि डागलेल्या कपड्यांची विल्हेवाट लावली.

Last Updated : Nov 28, 2022, 10:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.